27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरविशेषधारावीच्या कायापालटातून बदलणार चेहरामोहरा

धारावीच्या कायापालटातून बदलणार चेहरामोहरा

धारावीवासीय आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.

Google News Follow

Related

आजवर धारावीच्या या गरिबीची, बकाल वस्तीत राहावे लागत असल्याने इथल्या जनतेच्या हतबलतेची, भारत विरोधी शक्तींनी पुरेपूर चेष्टा केली आहे. भारताला गरीब, कंगाल, कमजोर राष्ट्र ठरवण्यासाठी धारावीचे उदाहरण देऊन त्याचा खूप वापरही करून घेतला आहे. त्यामुळे आजवर मुंबईसाठीच नाही तर भारतासाठी लाजिरवाणी बाब ठरलेली धारावी या प्रकल्पानंतर भारताचा अत्यंत यशस्वी कायाकल्प प्रकल्प म्हणून जगभरात प्रसिद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

धारावीचा इतिहास

ब्रिटिशांनी १८४५च्या दरम्यान माहीम आणि सायनला जोडण्यासाठी कॉजवे बनवला. त्या काळात धारावी परिसर दलदलयुक्त भाग होता. या कॉजवेच्या जवळ सुरुवातीला काही कोळी बांधव मिठी नदीत गोड्या पाण्यातील मासेमारी करण्यासाठी म्हणून येऊन राहू लागले. आजही या कोळ्यांची वस्ती धारावीच्या एका कोपऱ्यात आहे. पुढे १९३०च्या दरम्यान इथे एक चामड्याचा कारखाना उभा राहिला. त्याला जोडून चामड्याची कामे करणारे काही तामिळ कामगार गट इथे वस्तीला आले. गुजरात मधून कुंभार गट इथे येऊन त्यांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. उत्तरप्रदेशातून कपडे शिलाई करणारा शिंपी वर्ग इथे वस्तीला आला. या सगळ्या लोकांना ९९ वर्षाच्या करारावर ब्रिटिश सरकारने वस्ती करण्याची परवानगी दिली. १९४७ मधे मोठ्या प्रमाणात आलेल्या शरणार्थींमुळे धारावीची लोकसंख्या एकदम वाढून ३० हजारावर पोहोचली. पुढे वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध कारणासाठी आपले गाव, राज्य सोडलेले लोक इथे येऊन वसत राहिले आणि धारावीचा विस्तार पण वाढत गेला.

व्यवसाय

बाहेरून पाहणाऱ्यांसाठी धारावी एक भलीमोठी झोपडपट्टी असली तरी इथे १९,००० छोटेमोठे व्यवसाय, वर्कशॉप, कारखाने चालतात. चामडे व्यवसाय, कपडे निर्मिती, जवळपास २००० कुटुंबाना पोसणारे कुंभारकाम, संपूर्णपणे महिलांनी चालवलेला लिज्जत पापड, बेकरी आणि तत्सम अन्नपदार्थ बनवण्याचे व्यवसाय, पतंग व्यवसाय, चोख खऱ्या आणि नकली सोन्याचे दागिने बनवणे, छपाई व्यवसाय अशा अनेक उद्योगांसोबत प्लास्टिक आणि अन्य कचऱ्याच्या पुनर्वापराचा मोठा व्यवसाय इथे चालतो. जवळपास २.५ लाख लोकांना रोजगार देणाऱ्या या उद्योगांची वार्षिक उलाढाल साधारण ८००० कोटी रुपये इतकी आहे. असे कितीतरी व्यवसाय धारावीतल्या छोट्यामोठ्या गल्लीबोळांत चालत आहेत. या सर्व व्यावसायिकांना न्याय देणे हे एक अतिशय जबाबदारीचे म्हटले तर जिकिरीचे परंतु तितकेच महत्वाचे काम राज्य सरकारने पार पडायचा निर्णय घेतला आहे.

धारावी परिसर पुनर्निर्माण प्रकल्पाअंतर्गत या व्यवसायांना योग्य जागा, सुविधा, बाजारपेठ, उपलब्ध करून दिल्या जाणार असून उत्पादनांचे ब्रॅण्डिंग देखील केले जाणार असल्याने मुंबईचा, पर्यायाने महाराष्ट्राचाच महसूल वाढण्यास मदत होणार आहे. धारावीच्या कायाकल्प घडत असताना हे उत्तम चालते व्यवसाय बंद पडू न देता ते अधिक जोमाने वाढतील अश्या दृष्टीने सुविधा निर्मितीकडे सरकार लक्ष घालत आहे. यातूनच गेल्या तीन शतकांमध्ये भारतभरातून चार पैसे मिळवण्यासाठी मुंबईत आलेले आणि कामगार म्हणून हातावर पोट असणारे धारावीवासीय आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत.

हे ही वाचा:

WTC फायनल : लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विक्रमी खेळ

माझ्या बकऱ्याला का मारले? पाकिस्तानच्या लहानग्याला अश्रु अनावर

देशाच्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास

खडगपूरमध्ये अतिक्रमणावरून तणाव

केंद्र आणि महाराष्ट्र राज्य ही दोन्ही सरकार स्टार्टअप्स, व्यवसाय-उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी, उद्योजकतेच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे धारावीतील स्थानिकांचे व्यवसाय बंद पडणार, अशी जी हाकाटी पिटली जात आहे तो निव्वळ खोटा प्रचार आहे. धारावीत असलेल्या हजारो व्यवसायांना योग्य आणि पुरेशी जागा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतींमधून वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे या city within city म्हणजे शहरांतर्गत शहरात जुने व्यवसाय बंद पडणार नसून त्यांचीही अधिक चांगल्या रूपात पुनर्निर्मिती होणार आहे. व्यावसायिकता, लवचिकता बाणवण्याची अधिक उत्तम संधी या सर्व व्यावसायिकांना या निमित्ताने मिळणार आहे.

स्वप्नातले घर

धारावीकरांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या सात वर्षांत ५० हजार घरे तयार केली जाणार आहेत. सध्या जेथे लोकांना दाटीवाटीने गटारांच्या शेजारी दुर्गंधी सहन करत राहावे लागत आहे, तिथेच आता उत्तम स्वरूपाच्या इमारती बनणार आहेत. आणि या इमारतींमध्ये धारावीवासीयांना आपल्या मालकीची घरेही मिळणार आहेत. मालकीची घरे मिळण्याच्या अटींची पूर्तता करू न शकणाऱ्या धारावीच्या स्थानिक रहिवाशांना देखील भाडे तत्वावर घरे मिळणार आहेत. त्याशिवाय असे लोक घरे विकत देखील घेऊ शकतील. एवढेच नाही तर या जागेवर उभ्या राहणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरे धारावीबाहेरील लोकांना देखील विकत घेता येतील.

हे करताना धारावीकरांना वेगळी घरी आणि बाहेरच्या लोकांना वेगळ्या अधिक चांगल्या इमारती असा भेदभाव केला जाणार नाही. बिल्डर विकणार असलेल्या सदनिका कोणीही विकत घेऊ शकणार असल्याने गरीब श्रीमंत, धर्म, जात असा कोणताही भेद न राहता, धारावी खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन म्हणजेच सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेले शहर होणार आहे.

इतर सुविधा

निवासी इमारती, उद्याने, शाळा, आरोग्य सुविधा, रस्ते, मेट्रो इत्यादी दळणवळणाच्या सुविधा, मैदान, व्यवसायी जागा, अश्या अनेक सोयी पुरवणाऱ्या या महाप्रकल्पाचा आराखडा धारावीकरांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून पुनर्विकास, सशक्त पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचा विचार या तत्वांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, किरकोळ बाजारपेठा यासारख्या सर्व सुविधा रहिवाशांना त्यांच्या घरापासून १०-१५ मिनिटांच्या अंतरावर मिळाव्यात अशाप्रकारे हे नवे शहर नियोजन करण्यात येत आहे. मुंबईतील अत्याधुनिक रुग्णालयांच्या जाळ्याशी धारावीतील मोठी रुग्णालयेही जोडली जाणार आहेत. सध्याच्या गल्लीबोळांच्या ऐवजी दोन्ही बाजूला पदपथ असलेले प्रशस्त गाडी रस्ते बांधण्यात येणार आहेत.

धारावीत असलेल्या सुमारे १००० धार्मिक स्थानांपैकी कोणती स्थाने अनधिकृत आहेत, अधिकृतरीत्या बांधलेल्या धार्मिक इमारतींना पर्यायी इमारत कोठे बांधायची इत्यादी गोष्टींची सूची आणि योजनाही तयार करून झाली आहे.

निवासी हॉटेल, रेस्तराँ, कॅफे, शॉपिंग, कार्यालयांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. आज जिथून धड चालता येत नाही अशा या घनदाट लोकवस्तीच्या जागी, इथल्या रहिवाशांसाठी आता वाहतूक अनुकूल अखंड मल्टी मोडल प्रवास यंत्रणा उभी केली जाणार आहे. त्यामुळे बस आणि इतर परिवहन सुविधा, रस्त्यांचे जाळे, ट्रेन, नवा मेट्रो कॉररीडॉर इत्यादी विविध प्रकारे नव्या धारावीतील सर्वच लोक मुंबईच्या कोणत्याही टोकाला जाण्या-येण्यासाठी सुलभ, नियमित आणि जलद प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहेत. त्यासाठी विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण तर केले जाणारच आहे त्याचसोबत २१ किलोमीटरचे नवे रस्ते निर्माण करण्यात येणार आहे. सब-वे, भूमिगत लिफ्ट, सरकते जिने इत्यादी अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे मल्टिमोडल हब विमान प्रवासासाठी मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही सामान तपासणी, अन्नपाणी, बैठक व्यवस्था, मनोरंजन, खरेदी इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असणार आहे.

पर्यावरणाचा विचार

धारावीच्या मध्यवर्ती भागात एक सेंट्रल पार्क साकारणार आहे. त्याचा वापर विविध कार्यक्रम, सणानिमित्त उत्सव इत्यादींच्या आयोजनासाठी होऊ शकेल. याखेरीज इतर अनेक छोट्या मोठ्या उद्यानांपासून ते लहान क्रीडांगणांपर्यंत विविध बाबींचा प्रकल्पात समावेश केल्यामुळे धारावीकरांना उत्तम नियोजन केलेल्या हरित शहरात राहण्याची संधी चालून आली आहे.

माहीम निसर्गोद्यान ते रेल्वे विकास क्षेत्रापर्यंत रस्त्यांच्यामध्ये ग्रीन झोन तयार करून एक ग्रीन स्पाईन क्रॉसिंग निर्माण करण्यात येणार आहे. केवळ सांडपाण्याचा विसर्गच नाही तर पुराच्या पाण्याचे देखील व्यवस्थापनसुद्धा करण्यात येणार असल्याने गटारे तुंबून वाहणे, अस्वच्छता इतिहासजमा होईल. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट आणि धारावी प्रोमोनेड असे प्रकल्प मिठी नदीच्या काठी मोकळ्या जागेत (open space) प्रस्तावित करण्यात आले आहेत. ते साकारताना उत्तरेकडील खारफुटीच्या जंगलांचे संरक्षण केले जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा