देशभरात यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातही दिवाळीचा विशेष उत्सव पाहायला मिळाला. येथे नागरिकांनी दिव्यांच्या सहाय्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे लिहून आनंदोत्सव साजरा केला. लाल चौकातील घंटाघर परिसरात तब्बल २५,००० पेक्षा अधिक दिवे लावण्यात आले होते. यानिमित्ताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले.
देशातील इतर भागांमध्येही दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. घरांमध्ये मातीचे दिवे लावण्यात आले, तर मंदिरांमध्ये पूजा-अर्चा करून भक्तांनी सण साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. कोलकातामध्ये कालीपूजेचे आयोजन करण्यात आले. भारत-बांग्लादेश सीमारेषेवर तैनात जवानांनीही दिवे आणि मेणबत्त्यांनी दिवाळी साजरी केली.
दुसरीकडे, राजधानी दिल्लीत आणि आसपासच्या भागांमध्ये फटाक्यांमुळे प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली. हवामान गुणवत्ता निर्देशांक (AQI) ९९९ च्या वर गेला. म्हणजेच, हवा अत्यंत विषारी झाली असून अशा हवेत श्वास घेणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयाने फक्त “ग्रीन फटाक्यांना” आणि तेही ठरावीक वेळेत वापरण्याची परवानगी दिली होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून प्रदूषणाचा स्तर दुपटीहून अधिक वाढला.
हे ही वाचा :
‘इराणी अणु सुविधा नष्ट झालेल्या नाहीत, स्वप्ने पाहत राहा’
तालिबानने दहशतवादी हल्ले थांबवले तरच अफगाणिस्तानशी युद्धबंदी लागू होईल!
अमेरिकेतील या शहरांमध्ये दिवाळीची सुट्टी
हाय ब्लड प्रेशर आयुर्वेद, योग्य जीवनशैलीने करा नियंत्रित







