33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेषसंविधान दिन विशेष: भारतीय संविधानाची ही खासियत तुम्हाला माहित आहे का?

संविधान दिन विशेष: भारतीय संविधानाची ही खासियत तुम्हाला माहित आहे का?

Related

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राज्यकारभारासाठी लोकशाही व्यवस्था स्वीकारायचे आपण ठरवले. त्यानुसार स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १९४९ साली आजच्याच दिवशी म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी हे संविधान आपण स्वीकारले. त्यामुळेच आजचा दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान हे अनेक बाबींमुळे खास ठरते. भारतीय संविधानाची हीच खासियत आज आपण बघणार आहोत.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील संविधान आहे. सुरुवातीला भारताच्या संविधानात ३९५ कलम, २२ भाग आणि ८ शेड्युल होते. तर सध्याच्या घडीला जवळपास ४४८ आर्टिकल्स, २५ भाग आणि १२ शेड्युल आहेत. आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक वेळा भारतीय संविधानात सुधारणा करण्यात आली आहे.

जगभरातील विविध संविधानाचा अभ्यास करून त्यातील सर्व चांगल्या गोष्टी भारतीय संविधानात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, रशिया अशा अनेक देशांच्या संविधानाचा समावेश आहे.

हे ही वाचा:

एक लस असेल तर एक पेग

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

भारतीय संविधान हे मुळतः इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिले गेले आहे. संविधानाची मूळ प्रत ही कुठेही टाईप किंवा प्रिंट करण्यात आलेली नाही. त्या काळचे प्रसिद्ध कॅलीग्राफर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधानाची मूळ इंग्रजी प्रत लिहिली आहे. फ्लोटिंग इटालिक प्रकारच्या कॅलिग्राफी मध्ये ही मूळ प्रत लिहिण्यात आली आहे. तर वसंत कृष्‍णा वैद्य यांनी संविधानाची हिंदी प्रत लिहिली आहे.

संविधानाच्या मूळ प्रतींची सजावट ही शांतिनिकेतन मधील कलाकारांनी काढलेल्या चित्रांनी करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये अजरामर महाकाव्ये रामायण-महाभारत यातील महत्त्वाचे प्रसंग चित्र रुपात रेखाटण्यात आले आहेत.भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगाचेही दर्शन घडवून दिले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा वीरांची ही चित्रे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा