ईडीने सोमवारी छत्तीसगडच्या भिलाई येथील पदुमनगर भागात माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे चिरंजीव चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ईडीच्या टीम चार इनोव्हा कारमधून चैतन्य बघेल यांच्या भिलाई येथील निवासस्थानी पोहोचली. हा एक मोठ्या मोहिमेचा भाग असू शकतो, यात केंद्रीय तपास यंत्रणेने राज्यभरात सुमारे १४ ठिकाणी छापे टाकले आहेत त्यापैकी काही ठिकाणे चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित आहेत. दस्तऐवजांची तपासणी सुरू आहे. ईडीची टीम कोळसा घोटाळा आणि महादेव सट्टा ॲप प्रकरणी तपास करण्यासाठी आली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने त्यांच्या एक्स हँडलवर या छाप्याला त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे, “सात वर्षांपासून सुरू असलेल्या खोट्या प्रकरणाला न्यायालयाने फेटाळून लावले, त्यामुळे आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे महासचिव भूपेश बघेल यांच्या भिलाईतील निवासस्थानी प्रवेश केला आहे. जर या कटातून कोणीतरी पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती गैरसमजूत आहे.”
हेही वाचा..
मध्य प्रदेश: महू येथील जामा मशीद परिसरातून चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानिमित्त काढलेल्या रॅलीवर दगडफेक
पुण्यात काँग्रेसला खिंडार; माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पक्षाला राम राम
सेनापतीच तलवार म्यान करत असेल तर..
कोण आहे बीडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा नवा सम्राट ?नवा आका?
ही पहिलीच वेळ नाही की ईडीने बघेल यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये छत्तीसगडमध्ये शोधमोहीम राबवली आहे. याआधी २०२३ मध्ये, जेव्हा राज्यात निवडणुका होणार होत्या, तेव्हा प्रवर्तन संचालनालयाने रायपूर आणि दुर्ग जिल्ह्यांमध्ये बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा आणि दोन विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या (ओएसडी) कार्यालयांवर छापे टाकले होते.