22 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेष'पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!'

‘पाकिस्तानच्या भोलारी एअर बेसवर चार ब्रह्मोस पडली, AWACS विमान मोडून पडलं!’

पाकिस्तानच्या माजी हवाईदल अधिकाऱ्याने दिली कबुली

Google News Follow

Related

सिंध प्रांतातील भोलारी एअरबेसवर भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या AWACS विमानाचं नुकसान झाल्याची कबुली पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्याने दिली आहे. पाकिस्तानचे निवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी मान्य केलं की हल्ल्यात त्यांचं एक AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) विमान नष्ट झालं आहे.

पाकिस्तानी पत्रकार सोहराब बरकत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना मसूद अख्तर म्हणाले, “भारतीय फौजांनी सलग चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली… जमीन ते जमीन की हवेतून जमीन, हे नक्की माहिती नाही.”

“आपले वैमानिक विमानं वाचवण्यासाठी धावले, पण क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच राहिला. दुर्दैवाने चौथं क्षेपणास्त्र थेट भोलारी एअरबेसवर असलेल्या हँगरवर आदळलं, जिथे आमचं एक AWACS उभं होतं. विमानाचं नुकसान झालं आणि काही मृत्यूचीही नोंद झाली,” असं त्यांनी सांगितलं.

AWACS म्हणजे काय?

AWACS हे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचं एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. ही यंत्रणा:

  • शत्रूच्या हालचालींचा लवकर इशारा देते

  • थेट देखरेख आणि नियंत्रणाची सुविधा देते

  • हवाई युद्धात कमांड-सेंटरसारखी भूमिका बजावते

मात्र, भारतीय हल्ल्यांचं वेळेत अचूक भान ठेवण्यात ती यंत्रणा अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारताने ९ आणि १० मे दरम्यान पाकिस्तानमधील एकूण ११ लष्करी तळांवर हल्ले केले. त्यात भोलारी एअरबेसही सामील होता. अहवालांनुसार, फक्त भोलारीवरच तब्बल ५० जणांचा मृत्यू झाला.

भारत सरकारच्या PIB (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) च्या १४ मेच्या निवेदनात म्हटलं आहे, “भोलारी एअरबेसवर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. स्क्वाड्रन लीडर उस्मान युसूफ यांचा मृत्यू झाला आणि अनेक लढाऊ विमानं उद्ध्वस्त झाली.”

हे ही वाचा:

“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर इस्रायल खुश, दहशतवादविरुद्धच्या लढाईत पाठींबा!

“पाकचे दहशतवादाशी संबंध उघड झाल्यानंतर निधी देणं मोठी चूक”

“इंडी आघाडीचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही…” काँग्रेस नेते चिदंबरम असं का म्हणाले?

भोलारी एअरबेस: एक नवीन आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू

भोलारी ही पाकिस्तानची एक तुलनेने नवीन एअरबेस होती. ती २०१७ साली कार्यान्वित झाली होती. NDTV आणि Maxar Technologies कडून मिळालेल्या उच्च-रिझोल्यूशन उपग्रह चित्रांनुसार, ११ मे २०२५ रोजी हँगरची छप्पर पूर्णपणे उध्वस्त झाली होती.

“२७ एप्रिलला घेतलेली एक उपग्रह प्रतिमा — ज्या वेळी पाहलगाम हल्ल्यानंतर तणाव शिगेला पोहोचला होता — त्यात हँगर पूर्ण सुरक्षित दिसत होता,” असं अहवालात नमूद आहे.

पाहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’

२२ एप्रिल रोजी पाकिस्तानपुरस्कृत ४ इस्लामी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाममध्ये २६ निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं.

या ऑपरेशनद्वारे भारताने आतापर्यंत, ९ दहशतवादी तळ, अनेक हवाई संरक्षण यंत्रणा, १० लष्करी तळ, २ रेडिओ स्टेशन अशा विविध पाकिस्तानी संरचनांवर सर्जिकल स्ट्राइक केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा