६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांना मोठा धक्का बसला आहे. बॉम्बे हायकोर्टाने या दाम्पत्याला कोलंबोला जाण्याची परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, आधी फसवणुकीची रक्कम जमा करा, त्यानंतरच देशाबाहेर जाण्याच्या विनंतीवर विचार केला जाईल. शिल्पा शेट्टीला यूट्यूबच्या एका इव्हेंटसाठी कोलंबोला जायचे होते, त्यासाठी तिने कोर्टात याचिका दाखल केली होती.
सुनावणीदरम्यान अभिनेत्रीच्या वकिलांनी सांगितले की, हा कार्यक्रम २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी शिल्पा यांना उपस्थित राहायचे आहे. न्यायालयाने विचारले, “कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण आले आहे का?” यावर वकिलांनी उत्तर दिले की, केवळ फोनवर चर्चा झाली आहे आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरच अधिकृत निमंत्रण दिले जाईल. या उत्तरावर कठोर भूमिका घेत कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले – “आधी फसवणुकीचे ६० कोटी रुपये भरा, त्यानंतरच आम्ही या प्रकरणावर पुढील विचार करू.”
हेही वाचा..
“तुम्हाला कोणी रोखले? २६/११ नंतर पाकिस्तानवर दया दाखवल्याबद्दल पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका”
नवी मुंबईचे विमानतळ राज्याचा जीडीपी एका टक्क्याने वाढवेल
नाकाबंदीच्या वेळीच बँक अधिकाऱ्याची बॅग गायब; पोलिसांच्या नाकाखाली चोरी!
वर्सोव्यातून बांधकाम व्यवसायिकाचे ‘अपहरण’; अखेर नशामुक्ती केंद्रात सापडले!
बॉम्बे हायकोर्टाने सध्या शिल्पा शेट्टीच्या देशाबाहेर जाण्यावर बंदी कायम ठेवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लक्षात घ्या, या फसवणूक प्रकरणात शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध तपास यंत्रणेकडून एलओसी (लुक आउट सर्क्युलर) नोटीस जारी करण्यात आली होती, ज्यामुळे दोघांनाही विदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे.
व्यवसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. कोठारींचा आरोप आहे की, या दाम्पत्याने व्यवसाय विस्तारासाठी त्यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपात पैसे घेतले, पण कराच्या कारणास्तव त्यांनी त्याला गुंतवणूक म्हणून दाखविण्यास सांगितले. तक्रारीत कोठारी यांनी असेही नमूद केले की, शिल्पाने त्यांना व्याजासह पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा तिने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. अभिनेत्रीने व्यवसाय वाढविण्याच्या नावाखाली पैसे घेतले, पण ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले.







