31 C
Mumbai
Sunday, November 16, 2025
घरसंपादकीयदोन पोपटांचा जीव कुणाला हवाय?

दोन पोपटांचा जीव कुणाला हवाय?

जे मीर यार बलोच यांना कळले, ते सत्य भारतीयांनी उघड्या डोळ्यांनी बघावे

Google News Follow

Related

भारतीयांसाठी मीर यार बलोच हे काही अनोळखी नाव नाही. स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणारा एक क्रांतिकारी नेता. दोन दिवसांपूर्वी याने केलेल्या एका पोस्टमुळे काँग्रेस आणि पाकिस्तानच्या अभद्र युतीचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तानचा पडेल फिल्ड मार्शल आसिफ मुनीर याने अमेरिकेच्या भूमीवरून दिलेली एक धमकी प्रत्यक्षात आणण्यासाठी काँग्रेस नेते कसे काम करीत आहेत, हे या पोस्टमुळे बऱ्यापैकी स्पष्ट झालेले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी या देशातील बड्या उद्योगपतींच्या विरोधात सतत बोलत असतात. गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी हे जणू दरोडेखोर आहेत, असा त्यांचा अविर्भाव असतो. चोवीस तास राजकारण करणाऱ्या सोनिया गांधी त्यांचा परिवार त्यांचा जावई कोणताही उद्योग धंदा न करता गडगंज झालेले आहेत. हा पैसा कुठून आला असा प्रश्न त्यांना कोणी करत नाही, परंतु उद्योग साम्राज्याच्या बळावर श्रीमंत झालेल्या, देशात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणाऱ्या, विदेशात देशाचा झेंडा फडकवणाऱ्या उद्योगपतींना मात्र काँग्रेसचे नेते विरोध करतायत. ज्या चीनचे राहुल गांधी यांना प्रचंड कौतुक आहे, ते चीनचे नेते आपल्या देशातील उद्योगांना वाढवण्यासाठी काय काय करतात, हे बहुधा त्यांना माहित नसावे.
मीर यार बलोच यांनी दोन पाकिस्तानी पत्रकार उमर चिमा आणि साजिद तरार यांची एक मुलाखत एक्सवर पोस्ट केलेली आहे. त्यात साजिद तरार म्हणतो की भारताची जी श्रीमंती आहे ती चार गुजराती परिवारांच्या हातात एकवटली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण याच पोपटात आहे.

आसीम मुनीर ताम्पामधून म्हणाला होता की आम्ही रिलायन्सची जामनगरची ऱिफायनरी टार्गेट करू. त्याचा पुनरोच्चार या साजिद तरारने या मुलाखतीतून केला. हा साजिद तरार मूळचा पाकिस्तानी उद्योजक आहे, जो अमेरिकेत स्थायिक झाला आहे. मुनीर जेव्हा पाकिस्तानात आला होता तेव्हा या साजिद तरारला भेटला होता. त्यामुळे या तरारचे पाकिस्तानच्या लष्कराशी असलेले संबंध किती घट्ट आहेत, याची कल्पना येऊ शकते.

पाकिस्तान आणि काँग्रेसचे लक्ष्य एकच आहे. अदाणी-अंबानी. आसीम मुनीर आणि काँग्रेसचे लक्ष्य एकच आहे अदाणी-अंबानी. हे एका बलोच नेत्याच्या लक्षात आले. हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घेण्याची गरज आहे. येत्या काळात अंबानी आणि अदाणी यांना अधिक टार्गेट करण्यात येईल. त्याचेही कारण लक्षात घ्या. येत्या काळात आर्टीफिशिअल इंटेलिजन्सला अनन्य साधारण महत्व येणार आहे. अमेरिकेला असे वाटले होते की याबाबतीत चीन आपला प्रमुख स्पर्ध आहे. परंतु अमेरिकेत असलेल्या डेटा सेंटरच्या तुलनेत तीनपट मोठे डेटा सेंटर भारतात उभारले जाते आहे. रिलायन्स समुहाकडून या डेटा सेंटरची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी जाहीर केली आहे. वर्ल्ड बॅंकेच्या ताज्या अहवालात भारताने एआयच्या प्रांतात केलेल्या प्रगतीचे तोंड भरून कौतुक केलेले आहे. वर्ल्ड बॅंकेचे चीफ इकोनॉमिस्ट फ्रान्झिस्का ओहनसोर्ज यांनी ऑक्टबरच्या अहवालात भारताच्या एआयच्या प्रांतातील सज्जतेचे कौतुक केले असून ही तयारी विकसित देशांच्या तोडीची असल्याचे म्हटले आहे. देशातील नॉलेज वर्कर्स पैकी ९० टक्के लोक एआयचा वापर करतायत. २०३५ पर्यंत एआयमुळे देशाच्या अर्थकारणात २ ट्रिलियनची भर पडू शकते. एआयसाठी जगभरात असलेल्या बुद्धिमान लोकांपैकी १६ टक्के भारतात आहेत, असेही त्यांचा अहवाल म्हणतो.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर

केंद्र मंत्रिमंडळाने ४ मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

हा महिना अभिषेक-कलदीपचा!

मध्यप्रदेश सिरप प्रकरण : गुजरातमधील दोन औषध उत्पादक कंपन्या संशयाच्या भोवऱ्यात

मुकेश अंबानी जे काही करतायत त्यामुळे एआयच्या क्षेत्रात भारत पहील्या क्रमांकावर येऊ शकतो. कारण एआयसाठी सर्वात महत्वाचा कच्चा माल म्हणजे डेटा. त्यासाठी अंबानी ३० अब्ज डॉलर खर्च करणार आहेत. तीन गिगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर बनवणार आहेत. हे पूर्णपणे ५००० एकरांवर पसरलेल्या ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्समधून येणारी वीज, पवन उर्जा आणि हायड्रोजन एनर्जीवर चालणार आहे. व्हर्जिनियातील मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरच्या तुलनेत हे पाच पट क्षमतेचे आहे. मायक्रोसॉफ्टचे डेटा सेंटर ६०० मेगावॅट क्षमतेचे आहे.

येता काळ हा एआयचा आहे. एआयमुळे देशाचेच नव्हे जगाचे अर्थकारण बदलणार आहे. एकेकाळी ज्याची क्रुड तेलाच्या धंद्यावर हुकूमत तो जगाचा बादशहा असे समीकरण होते. उद्या ती जागा एआय घेणार आहे. डीफेन्स, फार्मा यांच्यासह अनेक उद्योगांचा कायापालट होणार आहे. ज्याच्याकडे एआय तो हनुमान उडी घेणार. ही उडी आपणच घ्यावी असे प्रत्येक देशाला वाटते आहे. अमेरिका, चीन त्यासाठी प्रचंड पैसा ओततायत. आपण त्यांच्याशी स्पर्धा करतोय. भारत आपल्या पुढे जाण्यासाठी रणनीती आखतोय ही बाब कुठच्या देशाला आवडेल. त्यामुळे भारताला रोखण्याचा प्रय़त्न होईल. ही स्पर्धा अंबानी आणि अदाणी यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे ज्याप्रकारे अदाणींवर बदनामी अस्त्र चालवले गेले, त्याच प्रकारे येत्या काळात मुकेश अंबानी यांच्याविरोधात मोहीम रावबण्यात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

पाकिस्तान हे चीन-अमेरिकेने संयुक्तपणे पाळलेले श्वान आहे. अमेरिका ज्यावर भुंकायला सांगतो. त्यावर पाकिस्तान भुंकतो. आसीम मुनीर पाकिस्तानात असताना मुनीरने रिलायन्साल धमकी दिली होती. जामनगर मधील रिफायनरी टार्गेट करण्याची ही धमकी होती. मुनीर यांचा खास अमेरिकेत बसलेला पाकिस्तानी उद्योजक साजिद तरार आता त्यात धमकीबाबत बोलतो आहे. जीन की जान तोते मे होती है, हे त्याचे उद्गार आहेत. त्यांना हा जीन संपवायचा आहे, त्यामुळे ते पोपटाला टार्गेट करणार हे उघड आहे.

राहुल गांधी सुद्धा येत्या काळात त्यांचा अदाणी-अंबानी विरोध तीव्र करण्याची शक्यता आहे. कारण भारताचे अर्थकारण मजबूत झाले तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताच्या अर्थकारणाला मजबुती देण्याची क्षमता अदाणी-अंबानी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशात वातावरण निर्मिती कऱण्याचे काम पाकिस्तान आणि चीनचे दलाल करीत आहेत. जणू या देशात उद्योगपती बनणे, त्या उद्योगपतींना सरकारने समर्थन करणे हे दोन्ही पाप आहे. अलिकडेच डोनाल्ड ट्रम्प कतारच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळ कतारच्या आमीरांनी ट्रम्प यांना जी मेजवानी दिली त्यात अमेरिकेच्या सगळ्या बड्या कंपन्यांचे सीईओ होते. त्यात बोईंग, मायक्रोसॉफ्ट, एमेझॉन, टेस्ला अशा सगळ्या बड्या कंपन्यांचे अधिकारी होते. प्रत्येक देशाचा राष्ट्रप्रमुख विदेशात गेल्यानंतर आपल्या देशातील बड्या कंपन्यांना मोठ्या डील मिळतील याचे प्रयत्न करतो. भारतात मात्र हे पाप असल्यासारखा बोभाटा काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात. हेच पक्ष याच उद्योगपतींकडून वारेमाप देणग्या मात्र घेत असतात. काही लोक धमक्या देऊन खंडणी वसूल कऱण्याचाही प्रय़त्न करीत असतात.

जे मीर यार बलोच यांना कळले, ते सत्य भारतीयांनी उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. या देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात जे ओंडके आहेत, त्यांना कठोरपणे दूर सारण्याची गरज आहे. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांना हे उद्योग बंद करायचे आहेत. जेणे करून तरुण मोठ्या संख्येने बेरोजगार होतील आणि राजकीय पक्षांसाठी सतरंज्या उचलण्याचे काम करतील किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हातात दगड घेतील.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
281,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा