27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषचप्पलमधून सापडले ३.८६ कोटींचे सोनं

चप्पलमधून सापडले ३.८६ कोटींचे सोनं

मुंबई विमानतळावर परदेशी नागरिक अटक

Google News Follow

Related

राजस्व गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याच्या तस्करीवर मोठी कारवाई करत अदीस अबाबामधून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या चाड देशाच्या एका नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून ३.८६ कोटी रुपये मूल्याचे ४,०१५ ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं, जे त्याने आपल्या चप्पलांच्या टाचांमध्ये लपवून ठेवले होते.

विशेष गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी कारवाई करत मुंबईत पोहोचताच त्या परदेशी नागरिकाला पकडलं. अत्यंत चलाखीने त्याने चप्पलांच्या टाचांमध्ये सोन्याचे बार लपवले होते. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाडच्या नागरिकाने सीमाशुल्क तपासणी आणि कायदेशीर ओळखीपासून बचाव करण्यासाठी अत्यंत असामान्य पद्धतीने सोनं लपवलं होतं. सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत हे सोनं जप्त करण्यात आलं आणि प्रवाशाला अटक करण्यात आली.

हेही वाचा..

रश्दी यांच्या डोळ्यावर चाकूने हल्ला करणाऱ्याला २५ वर्षांची शिक्षा

शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांनी मोदींचे मानले आभार!

तेलुगू मध्ये ‘केसरी चैप्टर २ ‘ चा ट्रेलर प्रदर्शित

ओडिशात विपरीत घडलं! वीज पडून १० जन ठार

अधिकार्‍यांनी सांगितले की, हे सोनं नेमकं कोणाकडे नेलं जाणार होतं किंवा कुणी मागवलं होतं, याचा तपास सुरू आहे. तसेच हे प्रकरण एखाद्या मोठ्या तस्करी नेटवर्कशी संबंधित आहे का, हेही तपासाचं विषय आहे. एप्रिल २०२५ मध्ये याच विमानतळावर डीआरआयने एक मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ६.३० कोटी रुपयांचं परदेशी मूळचं सोनं जप्त केलं होतं. त्या प्रवाशाने खास तयार केलेल्या सामानाच्या डब्यांमध्ये ते सोनं लपवलं होतं. त्याच्याही विरोधात सीमाशुल्क कायद्याअंतर्गत कारवाई करून त्वरित अटक करण्यात आली होती.

डीआरआय आंतरराष्ट्रीय प्रवेश बिंदूंवर सतत कडक नजर ठेवून आहे. मौल्यवान धातू आणि इतर प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गुप्त माहिती आणि निगराणीचा योग्य ताळमेळ साधून कारवाया केल्या जात आहेत. अशा आर्थिक स्थैर्य आणि सीमासुरक्षेसाठी धोका ठरणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालण्याची आपली वचनबद्धता डीआरआयने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा