29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषतेलुगू मध्ये 'केसरी चैप्टर २ ' चा ट्रेलर प्रदर्शित

तेलुगू मध्ये ‘केसरी चैप्टर २ ‘ चा ट्रेलर प्रदर्शित

Google News Follow

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सतत चर्चेत असतो. १८ एप्रिल रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘केसरी चैप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियांवाला बाग’ या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आता हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर या चित्रपटाचा तेलुगू ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘केसरी चैप्टर २’ चा तेलुगू ट्रेलर शेअर केला. हा ट्रेलर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं – ”लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, पण त्याने घाबरण्याऐवजी सत्याने उत्तर दिलं”… तेलुगूमध्ये रिलीज होत असल्यामुळे आता हा चित्रपट तेलुगू भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, जेथे देशभक्ती आणि ऐतिहासिक कथांबद्दल विशेष आकर्षण आहे.

याआधीही अक्षयने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्या पोस्टमध्ये चित्रपटाचा पोस्टर शेअर करण्यात आला होता, ज्यावर तेलुगू भाषेत ‘केसरी चैप्टर २ ‘ असे नाव लिहिले होते आणि खाली प्रदर्शनाची तारीख नमूद केली होती. हा पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिलं होतं, ”जे दफन झालं, ते फक्त सत्य नव्हतं, ते अपूर्ण न्याय होतं! ‘केसरी चैप्टर २ ‘ तेलुगूमध्ये २३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे.”

हेही वाचा..

पीओकेबद्दल रामभद्राचार्य म्हणाले, तो मिळणारच!

सिंधू जल करार स्थगित; दुबईतील हिंदू तरुणाला पाकिस्तानी सहकाऱ्यांनी पाण्याच्या थेंबासाठी तडफडवले

सर्वपक्षीय शिष्टमंडळात काँग्रेसने थरूर यांचे नाव वगळले; पण केंद्राने दाखवला विश्वास

“राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर कुठेही कमी पडणार नाही”

या चित्रपटात अक्षय कुमारने सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे, जे एक निर्भय वकील आहेत आणि जलियांवाला बाग नरसंहारानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर लढा देतात. दुसरीकडे, आर. माधवनने ब्रिटिश सरकारच्या वतीने लढणाऱ्या तेजतर्रार वकील नेविल मॅककिनलेची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर, अनन्या पांडे वकील दिलरीत गिलच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येते. हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट लिखित ‘द केस दैट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केले आहे. ‘केसरी चैप्टर 2’ १८ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा