भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. आधी पाकिस्तानकडून या नुकसानीचा नकार केला जात होता, पण आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकसान मान्य केलं आहे. नौदलाचे माजी अधिकारी आणि संरक्षण तज्ज्ञ जी.जे. सिंग यांनी सांगितलं की शाहबाज ‘मजबुरीने’ खोटं बोलत आहेत. नौदलाचे माजी अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञ जी.जे. सिंग म्हणाले, “पाकिस्तानने भारताकडून झालेलं नुकसान स्वीकारलं आहे. त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या हल्ल्यामुळे झालेलं नुकसान संसदेत किंवा जिथेही ते बोलत होते, तिथे कबूल केलं आहे.”
सिंग म्हणाले, “भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानला मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या पंतप्रधानांनी संसदेत किंवा जिथेही ते बोलत होते, हे कबूल केलं आहे की त्यांच्या लष्करप्रमुखाने फोन करून सांगितलं की भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला आहे आणि तिथे क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि इस्लामाबादपासून केवळ ११ किलोमीटरवर आहे. त्यांच्या पंतप्रधानांना हे नाकारता येणार नाही कारण इस्लामाबादमधील विविध देशांचे राजदूत हे भारताच्या बॉम्बहल्ल्याचा आवाज ऐकू शकले असतील, त्यामुळे नुकसान लपवता येणार नाही.”
हेही वाचा..
चप्पलमधून सापडले ३.८६ कोटींचे सोनं
रश्दी यांच्या डोळ्यावर चाकूने हल्ला करणाऱ्याला २५ वर्षांची शिक्षा
शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांनी मोदींचे मानले आभार!
ओडिशात विपरीत घडलं! वीज पडून १० जन ठार
जी.जे. सिंग पुढे म्हणाले, “शहबाज शरीफ यांनी इतर काही ठिकाणांवरही हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. भारताच्या डीजीएमओंनी हल्ल्यापूर्वी आणि नंतर पाकिस्तानच्या एअरबेसची स्थिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जगासमोर मांडली होती. टॉम कूपर आणि जॉन स्पेन्सर सारख्या विश्लेषकांनी भारताच्या हल्ल्याची पुष्टी केली आणि त्याचं कौतुकही केलं आहे. सुरक्षा तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या आणखी एका खोट्याचं उघड केलं. त्यांनी सांगितलं, “पाकिस्तान म्हणतो की भारताच्या डीजीएमओकडून सीझफायरसाठी कॉल आली होती, जे सरळसरळ खोटं आहे. भारताच्या हल्ल्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला कॉल केला होता. पहिली कॉल साधारणतः ९ किंवा ९.३० च्या सुमारास आली होती. तेव्हा आपल्या डीजीएमओ उपलब्ध नव्हते कारण ते ऑपरेशनमध्ये व्यस्त होते.”
“जेव्हा भारतीय सैन्याने आपलं उद्दिष्ट साध्य केलं, तेव्हा सुमारे साडेतीन वाजता भारताच्या डीजीएमओने पाकिस्तानच्या डीजीएमओला कॉल केला. त्या कॉलच्या वेळी पाकिस्तानचा डीजीएमओ सीझफायरची विनंती करू लागला. आम्ही आपलं उद्दिष्ट पूर्ण केलं होतं म्हणून मग दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबवण्यात आला. “शहबाज शरीफ यांना आपली राजकारणाची गाडी चालू ठेवायची आहे. ते आपल्या लोकांना खूश करण्यासाठी आणि सत्ता वाचवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्यं करत आहेत. त्यांना सत्य माहिती आहे. इस्लामाबाद ही राजधानी आहे, तिथं लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, सरकारचे मोठे अधिकारी आणि राजनयिक राहतात. शहबाज शरीफ त्यांच्यासमोर हे नुकसान लपवू शकत नाहीत, म्हणूनच त्यांना हे विधान करावं लागलं.”
