27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषपेंग्विनमुळे नाही; तर शुल्कवाढीमुळे वाढले उत्पन्न

पेंग्विनमुळे नाही; तर शुल्कवाढीमुळे वाढले उत्पन्न

Related

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये पेंग्विन आल्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. उत्पन्नामध्ये तब्बल १२ कोटी २६ लाख रुपये वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे. मात्र, प्रत्यक्षात २०१७ मध्ये राणीबाग प्रवेश शुल्कात प्रति माणसी केलेली वाढ, त्याशिवाय अन्य शुल्कातही झालेल्या वाढीमुळे राणीच्या बागेच्या उत्पन्नात वाढल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनच आता अडचणीत आले आहे.

पेंग्विन कक्षाच्या उभारणीच्या आधी एप्रिल २०१४ ते मार्च २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत राणीबाग प्राणिसंग्रहालायाचे उत्पन्न २ कोटी १० लाख इतके होते. पेंग्विन कक्षाच्या उभारणी आणि पेंग्विन आणल्यानंतर एप्रिल २०१७ ते मार्च २०२० या कालावधीत राणीबाग प्राणिसंग्रहालायाचे उत्पन्न १४ कोटी ३६ लाख इतके झाले. उत्पन्नात १२ कोटी २६ लाख रुपयांची वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात जुलै २०१७ मध्ये राणीबाग प्रवेश शुल्कासह अन्य शुल्क वाढीचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला होता.

हे ही वाचा:

भारतात पशुपालनामध्ये गाई नंबर वन!

राज्यांच्या सीमेवरील तपासणी ‘नाका’ बंदी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्याचा नाही!

तरुणाच्या ‘फिल्मी’ नाट्यावर पोलिसांनी टाकला पडदा!

२०१७ पर्यंत रानिबागेचे प्रवेश शुल्क १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी फक्त पाच रुपये होते. त्यानंतर ते तब्बल १०० रुपये करण्यात आले. पूर्वी १२ वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश शुल्क हे २ रुपये होते, तर नंतर ते २५ रुपये करण्यात आले. राणीच्या बागेत मोर्निंग वॉक करण्यासाठी २०१७ पूर्वी मासिक पासची किंमत ३० रुपये होती. मात्र, नंतर हे शुल्क १५० रुपये करण्यात आले. या सर्व शुल्क वाढीमुळे राणीबागचे उत्पन्न १४ कोटी ३६ लाख रुपयांवर पोहचले. मात्र शुल्क वाढ महापालिकेकडून लपवली जात आहे आणि पेंग्विनमुळेच राणीबागेचे उत्पन्न वाढल्याचा दावा केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा