26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरक्राईमनामाअश्लील संभाषण करणाऱ्याला महिलांनी चोप चोप चोपले

अश्लील संभाषण करणाऱ्याला महिलांनी चोप चोप चोपले

Related

फोनवर अश्लील संभाषण करणाऱ्या एका व्यक्तीला महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. शिवाजी आव्हाड असे अश्लील संभाषण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो मंत्रालयामध्ये अधिकारी आहे. महिलेशी ओळख वाढवून त्याने महिलेशी अश्लील संभाषण केले आणि संतापलेल्या महिलेने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने त्याला कल्याण येथे चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता.

बदलापूरची महिला एका सामाजिक संस्थेत काम करते. शिवाजी आव्हाड या अधिकाऱ्याने तिच्याशी समाजमाध्यमावर मैत्री केली. सामाजिक संस्थेची नोंदणी करून देतो, असे तिला सांगितले. याच बहाण्याने त्याने महिलेशी मैत्री वाढवली. त्यानंतर महिलेच्या मैत्रिणीला नगरसेविका बनवण्याचे आमिष दाखवत फोनवर अश्लील संभाषण केले. त्यानंतर आव्हाडने दोघी महिलांना कल्याणमधील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. हॉटेलमध्ये बोलावताच महिलांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये गाठून चांगलाच चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ काही क्षणातच समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

हे ही वाचा:

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत

भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम

महिलांनी आव्हाडला जबरदस्त चोप दिल्यावर महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी फक्त प्रतिबंधात्मक कारवाई करत जिथे राहता तिथे जाऊन तक्रार करा असा सल्ला महिलांना दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शिवाजी आव्हाडवर पोलिसांच्या मेहरबान भूमिकेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा