भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, आणि येत्या काळात चांगल्या पावसाळ्यामुळे व कृषी क्षेत्राच्या मजबुतीमुळे तिचे प्रदर्शन अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, कृषी, बांधकाम व सेवा क्षेत्रातील मजबुतीमुळे २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.४ टक्क्यांवर पोहोचला, ज्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी हा दर ६.५ टक्के इतका झाला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर आपल्या मीडिया मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर करताना सीतारामन म्हणाल्या की, “ही वाढीची गती कायम राहील आणि चांगल्या पावसाळ्यामुळे अर्थव्यवस्थेच्या कामगिरीत आणखी सुधारणा होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, “आपल्या बाजारातील खोली आता प्रत्यक्ष दिसू लागली आहे आणि याचा फायदा किरकोळ विक्रेत्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच होत आहे.”
हेही वाचा..
पाटण्यात लव्ह जिहाद: गोमांस खाऊ घालून धर्मांतराचा प्रयत्न!
पश्चिम बंगालमध्ये गुन्हेगारांना टीएमसीचे संरक्षण
भारतात नव्या कंपन्यांच्या नोंदणीत जबरदस्त वाढ
आपल्या संस्कृतीत सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचे अस्तित्व
सीतारामन म्हणाल्या, “आपली प्रणाली पारदर्शक आणि डिजिटल आहे. लोकांना कोणावरही अवलंबून न राहता घरी बसूनच सेवा मिळवता येतात. ही एक गतिशील आणि प्रगतीशील अर्थव्यवस्थेची खूण आहे.” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “आपली धोरणं श्रमप्रधान उद्योगांना पाठिंबा देणारी आहेत. हस्तकला, हस्तनिर्मित उत्पादने यांना मदत मिळेल, आणि उत्पादन क्षेत्र – ते रोजगारनिर्मिती करणारे असो की यंत्राधारित – यांना धोरणात्मक आधार दिला जाईल.”
त्यांनी हेही नमूद केले की, “गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येक अर्थसंकल्पात अशी ठोस धोरणं आणली, ज्याचा थेट लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग (MSME) यांना फायदा झाला.” शिवाय, त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं की, “२०१४ पासून संरक्षण क्षेत्रात लहान आणि मोठ्या गरजांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे – मग ते बुलेटप्रूफ जॅकेट्स असोत वा उंच भागात वेळीच पुरवठा करण्याची क्षमता. यामुळे संरक्षण उत्पादनात आणि निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे.”
