26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरविशेषआशिया कप क्रिकेटसाठी भारताची पाकिस्तानवर फुली

आशिया कप क्रिकेटसाठी भारताची पाकिस्तानवर फुली

Google News Follow

Related

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषक २०२३ चे आयोजन करणार आहे. मात्र, आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी याची माहिती दिली आहे.

भारतीय संघाने २००५-०६ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर २०१२-१३ सालापासून भारत पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट खेळलेला नाही.

२०२२ च्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेकडे सोपवण्यात आले. मात्र, तेथील राजकीय परिस्थिती चांगली नसल्यामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. २०२३ मध्ये ही स्पर्धा ५० षटकांची होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन आशिया चषकात सहभागी होण्याचा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवल्याचे वृत्त सुरुवातीला आले होते. पण, बीसीसीआयच्या एजीएममध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या जय शहा यांनी बोर्डाच्या एजीएममध्ये पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जय शहा यांनी सांगितले की, आशिया चषकासाठी आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, आशिया चषक स्पर्धेसाठी आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, आशिया चषकासाठी एखादे तटस्थ ठिकाण निवडणे ही काही मोठी गोष्ट नाही.

हे ही वाचा:

गांधी कुटुंबियांच्या मर्जीतले खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष

‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

भारताच्या या निर्णयावर अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना पाकिस्तान दौर्‍यावर जाऊ न देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर पाकिस्तानचा महान फलंदाज सईद अन्वरने ट्विटरवर टीका केली. अन्वरच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयला पुढील वर्षी आशियातील तटस्थ ठिकाणी खेळायचे असेल, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) भारतात २०२३ एकदिवसीय विश्वचषक आयोजित करण्यासाठी आयसीसीशी संपर्क साधावा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा