30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरदेश दुनियायुक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार

रशियाने मंगळवारीही युक्रेनमधील अनेक शहरांवर हवाई हल्ले केले.

Google News Follow

Related

रशियाने मंगळवारीही युक्रेनमधील अनेक शहरांवर हवाई हल्ले केले. कीवमधील ऊर्जा प्रकल्पावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन आणि मायकोलायव्हमध्ये एक जण ठार झाला आहे. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कीवसह अनेक शहरांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. थंड हवामान सुरू होण्यापूर्वी पायाभूत सुविधांवर हल्ला करून युक्रेनला अंधारात टाकून शांतता चर्चा अशक्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर केला आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, गेल्या आठवड्यात रशियन हल्ल्याने युक्रेनमधील एक तृतीयांश वीज केंद्र नष्ट केल्यामुळे देशभरात वीज संकट निर्माण झाले. हल्ल्यामुळे पाणीपुरवठाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. दोन पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. ज्यामुळे खूप नुकसान झाले आहे, असं कीवचे महापौर विटाली क्लिश्को यांनी सांगितले. त्याच वेळी, युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचे सहकारी किरिलो टायमोशेन्को यांनी आग्नेय शहर नेप्रोमध्ये दोन रॉकेट हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दक्षिण युक्रेनमधील मायकोलायवमधील एका अपार्टमेंटमध्ये क्षेपणास्त्र आदळले आणि त्यात एकाचा मृत्यू झाला. रशियाच्या सीमेला लागून असलेल्या खार्किवमध्येही वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

दहशत माजवण्याचाचा आरोप

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर दहशतवादी आणि हवाई हल्ले करून नागरिकांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एक दिवस आधी १७ ऑक्टोबर रोजी कीव आणि इतर शहरांमध्ये ड्रोन हल्ल्यात किमान चार लोक ठार झाले होते. युक्रेन आक्रमकांच्या हल्ल्याचा बळी आहे. ते सतत त्यांच्याकडून शक्य ते करत असतात, दहशत माजवतात आणि नागरिकांना मारतात. हा दहशतवादी देश याशिवाय दुसरे काहीही करू शकणार नाही असं झेलेन्स्की यांनी टेलीग्राम मेसेजिंगवर लिहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा