25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरविशेषकसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजाचं वर्चस्व; दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजाचं वर्चस्व; दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

Related

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून सुपर स्पोर्ट्स पार्क सेन्चुरियन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला रविवारी २६ डिसेंबर रोजी सुरुवात झाली. काल भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ३ बाद २७२ धावा केल्या होत्या.

भारताकडून सलामीवीरांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या उभी केली. सलामीवीर के एल राहुलने शतकी खेळी केली. तर मयांक अग्रवाल याने अर्धशतक केले. के एल राहुलने २४८ चेंडूत १७ चौकार आणि एक षटकारासह १२२ धावांची खेळी केली. मयांक अग्रवाल याने नऊ चौकारांसह १२३ चेंडूत ६० धावा केल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा हा पहिल्याच चेंडूत बाद झाला. कर्णधार विराट कोहली याने ९४ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. दिवासाच्या अखेरीस अजिंक्य रहाणे ४० धावांवर आणि के एल राहुल १२२ धावांवर नाबाद होते.

हे ही वाचा:

‘गोपीचंद पडळकर प्रकरणात पोलिस अधिकारी सामील’

नितेश राणेंचे निलंबन करण्याची मागणी

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

दरम्यान, भारताचे तीनही फलंदाज लुंगी एंगिडीने बाद केले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त साऊथ आफ्रिकेच्या कोणत्याही गोलंदाजाला अद्याप यश मिळालेले नाही. एंगिडीने १७ षटकांमध्ये ४५ धावा देत ३ बळी घेतले आहेत.

आजच्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने आजचा खेळ अद्याप सुरू झालेला नाही. वेदर फोरकास्टनुसार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पावसामुळे गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आता पावसानंतर खेळ सुरू झाल्यावर खेळ कोणात्या संघाच्या बाजूने झुकणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा