30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषनौदलाने वाचवले १४६ मच्छिमारांना

नौदलाने वाचवले १४६ मच्छिमारांना

Google News Follow

Related

काल तौक्ते वादळाचा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या २७३ पैकी १४६ मच्छिमारांना काल रात्रभरच चाललेल्या बाचवकार्यानंतर वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे.

चक्रीवादळात अनेक बोटी आणि जहाजं खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या होत्या. नौदलानं बचाव मोहिम राबवत बोटी आणि जहाजांवर अडकलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं. त्यासाठी नौदलाची बचाव मोहीम रात्रभर सुरु होती. तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या पी-३०५ या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी आज सकाळी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर्स रवाना झाली आहेत. मुंबईच्या समुद्रातील आयएनएस शिख्रा या युद्धनौकेवरून ही हेलिकॉप्टर्स रवाना झाली.

अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि खवळलेल्या समुद्रात हे कार्य करण्यात आलं. १३७ जणांसह बार्ज ‘गॅल कन्स्ट्रक्टर’ हे कुलाब पॉइंटच्या ४८ समुद्री मैल (नॉटिकल मैल-एनएम) उत्तरेकडे चालले आहे. इमरजेंसी टोव्हिंग वेसल ‘वॉटर लिली’, दोन सपोर्ट वेसल आणि सीजीएस सम्राट कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.शोध आणि बचाव मोहिम (एसएआर ऑपरेशन्स) संपूर्ण रात्रभर होती आणि आज सकाळी ६ वाजेपर्यंत १४६ लोकांना वाचवलं गेलं. ज्यामध्ये १११ आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकातानं १७ जणांना, तर ओएसव्ही ग्रीटशिप अहिल्या आणि ओएसव्ही ओशन एनर्जीद्वारे १८ जणांना वाचवले.

हे ही वाचा:

कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

२३ मे रोजी सर्व ऑनलाईन व्यवहार बंद?

दरम्यान, आज सुरु असलेल्या बचाव प्रयत्नांना आज सकाळी भारतीय नौदल पी ८ आय विमानाने नजर ठेवली जात आहे. हवामानाच्या परिस्थितीनुसार, शोध आणि बचाव मोहिमेसाठी भारतीय नौदलाची हेलिकॉप्टर तैनात केली जातील. सध्या सुरु असलेल्या एसएआरला वाढविण्यासाठी अधिक नौदल प्रयत्न दिवसभर सुरु राहतील.

दरम्यान, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर विध्वंसक तोक्ते चक्रवादळ सोमवारी (१७ मे) रोजी रात्रीच्या सुमारास गुजरातच्या समुद्रकिनारी धडकलं. यावेळेला चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी १८५ किलोमीटर इतका नोंदवला गेला. गुजरात किनाऱ्यावर दीव ते महुवादरम्यान तोक्ते चक्रीवादळ जमिनीवर धडकले. आज दिवसाच्या अखेरपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता ही टप्प्याटप्प्यानं कमी होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

वादळानंतरही परिणाम जाणवत राहतील

कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांपासून हे वादळ बरंच पुढे गेलं असलं तरीही वादळाचे परिणाम मात्र अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कोकणातील बहुतांश भाग अद्यापही ढगाळलेला आहे तर काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी सुरुच आहेत. तर, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्येही असंच काहीसं चित्र दिसत आहे. त्यामुळं तौक्ते सरलं असलं तरीही त्याचे परिणाम मात्र अद्यापही दिसत आहेत असंच म्हणावं लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा