29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर विशेष भारतीय रेल्वे होणार जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे

भारतीय रेल्वे होणार जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे

Related

भारतीय रेल्वेची वाटचाल ही जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे होण्याच्या दिशेने सुरु आहे. २०३० सालापूर्वी “संपूर्णपणे शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याकडे रेल्वेचे मार्गक्रमण करीत आहे. नव्या भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वे कार्यरत आहे. कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर आणि प्रवासी तसेच मालवाहतूक करणारे आधुनिक साधन व्हावे या संपूर्ण संकल्पनेला अनुसरून रेल्वे कार्य करीत आहे. यासोबतच रेल्वे पूर्णतः पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्नशील आहे. मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, पाणी तसेच कागद यांचे जतन करण्यापासून ते रेल्वे मार्गांवर जखमी होण्यापासून प्राण्यांचा बचाव करण्यापर्यंत विविध प्रयत्नांच्या माध्यमातून पर्यावरण उत्तम राखण्याच्या दृष्टीने रेल्वे कार्यरत आहे.

२०१४ पासून पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेले आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करणारे रेल्वेचे विद्युतीकरण हे १० पटीने वाढले आहे. २०२३ पर्यंत सर्व ब्रॉड गेज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करून ब्रॉड गेज मार्गांचे १००% विद्युतीकरणाचे लक्ष्य गाठण्याची योजना रेल्वेतर्फे आखली गेली आहे.

भारतीय रेल्वेचे मालवाहतूक मार्ग दीर्घकालीन कमी कार्बन उत्सर्जन आराखड्यासह हरित वाहतूक जाळे म्हणून विकसित होत आहेत, ज्याद्वारे रेल्वेला उर्जेच्या बाबतीत अधिक कार्यक्षम आणि कार्बन-स्नेही तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि पद्धतींचा स्वीकार करणे शक्य होईल.

हे ही वाचा:

राज्यात सध्या तीन सरकारं

ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला

चिकन सूप आणि भातखळकर

अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल

हरित प्रमाणीकरण आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी:
भारतीय रेल्वेमध्ये हरित उपक्रम सुलभपणे राबविण्यासाठी २०१६ मध्ये रेल्वे विभाग आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार रेल्वेचे ३९ वर्कशॉप्स, ७ उत्पादन एकके, ८ लोको शेड्स आणि १ स्टोअर्स डेपो आता ‘ग्रीनको’ प्रमाणपत्र धारक आहेत. यामध्ये २ प्लॅटीनम १५ सुवर्ण आणि १८ रौप्य श्रेणीधारकांचा समावेश आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा