32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष आशियाई विजेते बॉक्सर डिंको सिंह कालवश

आशियाई विजेते बॉक्सर डिंको सिंह कालवश

Related

बॅंकॉकला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा आणि त्यामुळे चर्चेत आलेले बॉक्सर डिंको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. डिंको सिंह गेल्या काही काळापासून कर्करोगाने आजारी होते. २०१७ पासून त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.

गेल्या वर्षी डिंको यांना करोनाची लागण झाली होती. पण ४१ वर्षीय डिंको यांनी कोरोनावर मात केली. २०२० मध्ये डिंको यांना दिल्लीच्या इन्स्टीट्यूट ऑफ लिव्हर अँड बायलियरी सायन्समध्ये रेडिएशन थेरेपी देण्यात आली होती. त्यानंतर ते त्याच्या निवासस्थानी इन्फाळ येथे गेले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिंको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डिंको सिंह यांच्या निधनामुळे आपण दुःखी झालो आहोत. त्यांना देशाला अनेक मानसन्मान मिळवून दिले. विशेष म्हणजे बॉक्सिंग या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, असे पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.

हे ही वाचा :

अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी

४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

कॅनडातून आलेल्या पार्सलमध्ये सापडला कोट्यवधींचा गांजा 

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

डिंको सिंह यांना १९९८ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजीजू यांच्यासह अनेक खेळाडूंनी डिंको यांना श्रद्धांजली दिली आहे.

दिग्गज बॉक्सर मेरी कोमने देखील डिंको यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डिंको सिंह यांच्या खेळातूनच मेरी कोमने प्रेरणा घेतली आणि ती विश्वविजेतीही ठरली.

भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजीजू म्हणाले, डिंको सिंह यांच्या निधनाने मी दु:खी झालो आहे. ते भारताचे सर्वोत्तम बॉक्सर होते. १९९८ साली सुवर्णपदक जिंकून त्यांनी देशात बॉक्सिंग क्रांतीला जन्म दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ
ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारा बॉक्सर विजेंदर सिंहने देखील सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. डिंको सिंह यांनी निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून काम केले होते. सहा वेळा जागितक चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोम आणि सरिता देवी यांचे ते प्रेरणास्थान होते.

 

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा