32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेष'ही' असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

Google News Follow

Related

जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने आज भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत फोर-डोर कूप्स-ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या दोन पूर्णपणे इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. ऑडी ई-ट्रॉन जीटी पूर्ण पणे नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून ती स्पोर्टीनेस, एक्सक्लूझिविटी आणि आराम प्रदान करते. ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी कोणत्याही इतर आरएस पेक्षा वेगळी आहे. हे ऑडीचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल सीरीज उत्पादन आहे.

ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ३९० किलोवॅटची पॉवर आहे आणि ती ४.१ सेकंदात ताशी १०० किमीचा सुपरफास्ट वेग धारण करते. तर ४७५ किलोवॅट आरएस ई-ट्रॉन जीटी केवळ ३.३ सेकंदात हा वेग धारण करते. ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी मध्ये ८३.७/९३.४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी आहे. ती ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी साठी ४०१-४८१ किमी आणि ऑडी ई-ट्रॉन जीटी (डब्ल्यूएलटीपी कम्पाइंड) साठी ३८८-५०० किमीची रेंज प्रदान करते. २७० किलोवॅट डीसी चार्जिंग पॉवर आणि ८०० व्होल्ट तंत्रज्ञानासह नेक्स्ट लेवल हाय पॉवर चार्जिंग, सुमारे २२ मिनिटात २% ते ८०% पर्यंत चार्ज होते. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि आरएस ई – ट्रॉन जीटी अनुक्रमे १,७९,९०,००० आणि २,०४,९९,००० रुपयांत (एक्स-शोरूम) भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री बलबीर सिंह ढिल्लो म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आम्ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरकार लाँच करत आहोत. जुलै २०२१ नंतर हे आमचे चौथे आणि एकूण पाचवे इलेक्ट्रिक वाहन लाँच झाले आहे. ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई- ट्रॉन जीटी ऑडीचे अल्टिमेट ब्रँडशेपर आहेत. प्रगती करणाऱ्या प्रीमियम ब्रँडच्या रुपात ऑडीचा निरंतर विकास त्यांच्याद्वारे अभिव्यक्त होतो. हे दोन फोर-डोर कूप डीएनए आणि प्रीमियम मोबिलिटीच्या भविष्याला आकार देण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहेत.”

हे ही वाचा:

किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

ऑडी व्हर्चुअल कॉकपिट आणि एमएमआय टच ३१.२४ सेमी (१२.३″) आणि २५.६५ सेमी (१०.१″) च्या डिस्प्लेसह स्टँडर्ड रुपात येतात. ऑडी आरएस ईट्रॉन जीटी वर मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स स्टँडर्डच्या रुपात येते. तर ऑडी ई-ट्रॉन जीटी वर एलईडी हेडलाइट्स स्टँडर्ड आहेत. ऑडी लेजर लाइटसह मॅट्रिक्स एलईडी हेडलँप दोन्ही कारवर एक पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. या दोन्ही कार लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम आणि क्रूज कंट्रोलसह येतात तसेच यामध्ये ३६० डिग्री कॅमेऱ्यांसह पार्क असिस्ट प्लस पॅकेज वैकल्पिक रुपात उपलब्ध आहे. या कार्स पॅनोरमिक ग्लास रुफने सुसज्ज असून कार्बन रुपात अपग्रेड करता येतात. या दोन्ही कार आयबिस व्हाइट, एस्कारी ब्लू, डेटोना ग्रे, फअलोरेट सिल्व्हर, केमोरा ग्रे, माइतोस ब्लॅक, सुजुका ग्रे, टॅक्टिक्स ग्रीन आणि टँगो रेड या नऊ रंगात उपलब्ध आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा