इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ हंगामापूर्वी, राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड़ पाय फ्रॅक्चर असताना कुबड्या घेऊन सराव शिबिरात पोहोचले. बेंगळुरूमधील एका क्लब सामन्यात राहुल यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. ते प्रशिक्षण सत्रासाठी कुबड्च्या साहाय्याने सराव सत्रात पोहोचले.
आरआरने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, द्रविड़ पायाला फ्रॅक्चर असूनही गोल्फ कार्टमधून प्रशिक्षण सत्रात येताना आणि कार्टमधून उतरताच कुबड्याचा आधार घेताना दिसले. दुखापतीनंतरही आणि हालचालींसाठी कुबड्यांवर अवलंबून असूनही, मुख्य प्रशिक्षक सक्रियपणे प्रशिक्षणात सहभागी झाले होते आणि संपूर्ण सत्रावर बारकाईने लक्ष ठेवत होते.
श्री नासूर मेमोरियल शील्डसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन गट I, लीग III उपांत्य फेरीत जयनगर क्रिकेटर्सविरुद्ध विजया क्रिकेट क्लबकडून खेळताना द्रविड़ यांच्या डाव्या पायाच्या पिंडरीच्या स्नायूंना दुखापत झाली. राजस्थान रॉयल्सने बुधवारी द्रविड़ यांचा छायाचित्र शेअर केला. ज्यामध्ये ते डाव्या पायाला प्लास्टर लावून दिसत होते.
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक द्रविड़ यांनी २२ फेब्रुवारी रोजी नासूर मेमोरियल शील्डमध्ये केएससीए ग्रुप I, डिव्हिजन III लीग सामन्यात आपल्या लहान मुलगा अन्वयसोबत खेळून क्रिकेटच्या मैदानावर आश्चर्यकारक पुनरागमन केले. द्रविड़ आणि अन्वय यांनी बेंगळुरूमधील एसएलएस क्रीडांगण क्रिकेट मैदानावर यंग लायन्स क्लबविरुद्ध ५० षटकांच्या सामन्यात विजया क्रिकेट क्लब (मालूर) चे प्रतिनिधित्व केले. भारतीय क्रिकेट दिग्गज द्रविड़ सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले आणि आठ चेंडूंमध्ये १० धावा करून बाद झाले. या सामन्यात त्यांनी आपल्या मुलासोबत पाचव्या गड्यासाठी १७ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा :
पाकने बेजबाबदार वक्तव्ये करण्यापेक्षा अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावं
पाकने बेजबाबदार वक्तव्ये करण्यापेक्षा अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावं
कोल्हापुरातील ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी पुन्हा एकदा जनआंदोलन!
‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन
द्रविड़ यांनी आपला दुसरा सामना जयनगर क्रिकेटर्सविरुद्ध उपांत्य फेरीत खेळला. विजया क्रिकेट क्लब सातव्या षटकात १२/३ अशा कठीण परिस्थितीत असताना, द्रविड़ आपल्या मुलासोबत फलंदाजीला उतरले. ५२ वर्षीय द्रविड़ यांना दोन चेंडूनंतरच पायात वेदना जाणवू लागल्या. तरीही त्यांनी खेळ सुरू ठेवला आणि चौथ्या गड्यासाठी अन्वयसोबत ६६ चेंडूंमध्ये ४३ धावांची भागीदारी केली. अखेर वेदनांमुळे त्यांना सामन्यातून माघार घ्यावी लागली. मात्र, त्यांच्या धैर्यपूर्ण खेळीनेही विजया क्रिकेट क्लबला अंतिम फेरीत पोहोचवू शकले नाही.
राजस्थान रॉयल्स, ज्यांनी २००८ मध्ये पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते आणि २०२२ मध्ये अंतिम फेरीत पोहोचले होते. 23 मार्च रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या आयपीएल २०२५ मोहिमेची सुरुवात करेल.