29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर विशेष संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ

संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ

Related

महाराष्ट्र कठीण प्रसंगातून जात असताना राज्य पोलीस दलाचे प्रमुख पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अचानक सुट्टीवर जाण्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते. संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या चौकशीसाठी नकार दिल्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्यामुळे पांडे हे अचानक सुट्टीवर गेल्याची चर्चा रंगली होती. मात्र असा कुठलाही प्रकार नसल्याचे संजय पांडे यांनी सांगितले असून आपण केवळ दोन दिवसांच्या सुट्टीवर कुटुंबाला भेटण्यासाठी आलेलो असून विमान सेवा सुरळीत होताच लवकरच कर्त्याव्यावर हजर होणार असल्याचे संजय पांडे यांनी सांगितले आहे.

रविवार सायंकाळ पर्यत संजय पांडे हे मुंबईत होते, व त्यांनी एक दोन बैठकांना देखील हजेरी लावली होती. दोन दिवसांपूर्वीच पांडे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि गृहमंत्री दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याबाबत चर्चा केली होती. त्यांना सुट्टीवर जाण्याची परवानगीदेखील देण्यात आली होती. त्यानंतर मात्र त्यांना रविवार पर्यत थांबण्यास सांगण्यात आले होते, रविवारी झालेल्या बैठका आटोपून पांडे हे रविवारी विमानाने चंदीगड येथे दाखल झाले.

चंदीगड येथे त्यांची पत्नी राहत असून मुलगा अमेरिकेत राहण्यास आहे. पत्नीला भेटण्यासाठी ते चंदीगड येथे आले आहे.
राज्यातील परिस्थिती वाईट असतांना पोलीस विभागाच्या प्रमुखाने अचानक रजेवर जाण्यामुळे सोमवारी राजकीय चर्चा रंगली. संजय पांडे यांनी सोमवारी पुन्हा कर्तव्यावर हजर होण्याची तयारी केली मात्र चक्रीवादळा मुळे विमानसेवा बंद असल्यामुळे संजय पांडे अडकून पडले आहेत. आज रात्रीपर्यत मुंबईतील वादळ शांत होऊन विमानसेवा सुरू झाल्यावर उद्या संजय पांडे हे कर्तव्यावर हजर होतील, अशी माहिती पांडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याकडे गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील हंगामी पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.त्याआधी, हेमंत नगराळे यांच्याकडे ही जबाबदारी होती. पण त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याजागी रजनीश सेठ यांची नियुक्ती केली गेली. त्याविरोधात पांडे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला होता.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा