30.5 C
Mumbai
Wednesday, June 3, 2026
घरविशेषलँड जिहादचा पॅटर्न विक्रोळी पार्कसाईटमध्येही

लँड जिहादचा पॅटर्न विक्रोळी पार्कसाईटमध्येही

किरीट सोमय्या यांनी लावून धरले होते प्रकरण

Google News Follow

Related

लँड जिहाद करून जागा बळकावणे, तेथे बांगलादेशी घुसखोरांना वसवून लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवून आणणे आणि लोकसंख्यात्मक प्राबल्य दाखवत वोट जिहाद करून मुस्लिमलोलुप पक्षाच्या हाती सत्ता सोपवणे या दुष्टचक्रामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबईला गंभीर धोका निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या पालकमंत्री झालेल्या काँग्रेसच्या अस्लम शेखने मुंबई महानगरपालिकेत देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे याचा फायदा घेऊन मालाड-मालवणी, मढ भागातील सरकारी जमिनी घेऊन तेथे बांगलादेशी घुसखोरांना वसवले आणि स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ निर्माण केला. तेथून जवळच असलेल्या विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातही तसाच प्रकार झाला असल्याचे नुकतेच उघडकीस आले. मुंबई महानगरपालिकेने गलिच्छ वस्ती पुनर्वसन योजनेखाली पार्कसाईट भागात बांधलेल्या इमारती फिरोज लाला याने याने बळकावल्या असून तेथे बांगलादेशी घुसखोर वसवले आहेत असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या भागात ₹५०० कोटींच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा झाला असल्याचा आरोप परिसराची पाहणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच केला. मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असताना गलिच्छ वस्ती पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) या मालमत्ता वर्षानुवर्षे पडून राहिल्या होत्या. याचाच गैरफायदा घेत मुसलमानांच्या तालावर नाचणाऱ्या राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने निर्धास्त झालेल्या जमीन माफियाने ती बळकावून तेथे बांगलादेशी घुसखोरांची वस्ती उभारली असल्याचा आरोप आहे.
 

 

विक्रोळी पार्कसाईटच्या सागर नगर भागातील गलिच्छ वस्ती पुनर्वसन योजनेखाली बांधलेली इमारत अनेक वर्षे ओसाड पडली होती. किरीट सोमय्या यांनी जेव्हा तेथे पाहणी केली, तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महापालिकेची जागा असून, फिरोज लाला या भूमाफियाने ती बळकावली आहे. या इमारतीमध्ये बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे तेथे रहिवासी वस्ती असूनही प्राण्यांची बेकायदा कत्तल होत असल्याचे आणि दलित मुलींवर अत्याचारासारखे गुन्हे घडत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, “हे लँड जिहादचे उदाहरण आहे. सुमारे ₹५०० कोटी किंमतीची मालमत्ता बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथे अवैध वस्त्या वसवल्या जात आहेत. गलिच्छ वस्ती पुनर्वसन योजनेचा दुरुपयोग मुंबईत नवीन नाही. विक्रोळीप्रमाणेच इतर भागांतही डेव्हलपर, अधिकारी आणि भूमाफिया यांच्या संगनमताने सरकारी जागा बळकावल्या जातात. विक्रोळीत ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली योजना अडकली आणि कब्जा वाढला. यामागे राजकीय संरक्षण असल्याचा आहे.”हे ही वाचा:

परकीय चलन साठा वाचवण्यासाठी सोन्याची विक्री? सत्य काय?

अमेरिकेचा भारतासह ६० देशांवर नव्या शुल्काचा प्रस्ताव

वाळवीने पैसे खाल्ले! १ कोटींच्या नोटा फस्त

आरे जंगलात उभारलेल्या बेकायदा दर्ग्यावर पडला हातोडा

मालवणी पॅटर्न: मुंबईतील लँड जिहादचे मॉडेल

विक्रोळी हे प्रकरण मालवणी पॅटर्नचे विस्तारित रूप आहे. मालाड-मालवणी भागात काँग्रेस आमदार असलम शेख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्री असताना अवैध घुसखोरी, लँड कब्जा आणि वोट बँक राजकारण जोरात होते. मालवणी सुमारे १२०० एकर क्षेत्रात पसरलेला आहे. येथे लाखो अवैध वस्त्या उभ्या राहिल्या. बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना आश्रय दिला गेला. मालवणी पॅटर्न म्हणजे:

लँड जिहाद: सरकारी, खासगी किंवा ओसाड जागा बळकावणे.

लोकसंख्या जिहाद: मोठ्या संख्येने घुसखोर आणणे आणि वसवणे.

व्यवसाय जिहाद: अवैध धंदे, छोटे विक्रेते, बकरी कत्तल इत्यादी सुरू करणे.

संरक्षण जाळे: राजकीय नेते, पोलीस, अधिकारी आणि इस्लामिक संस्थांमार्फत संरक्षण.

अस्लम शेख यांना “मालवणी पॅटर्नचे जनक” म्हटले जाते. २०२५ मध्ये मुंबई उपनगरपालनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मालवणीतील अवैध बांगलादेशी-रोहिंग्या वस्त्यांविरुद्ध कारवाई केली तेव्हा अस्लम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा मतदारसंघातील आमदार हरून खान सारखे इतर नेतेही या भागात सक्रिय आहेत. वर्सोवा सारख्या भागांतही असाच पॅटर्न दिसतो.

उद्धव ठाकरे सरकार आणि असलम शेख यांचा सहभाग

जानेवारी २०२० ते जून २०२२ या काळात उद्धव ठाकरे यांनी अस्लम शेखना मुंबईचे पालकमंत्री केले. कोविड काळात कोव्हीड साथीमुळे संपूर्ण राज्य ठप्प असताना घुसखोरी आणि कागदपत्रे बनवण्याचे काम मात्र वेगाने चालले. आधार कार्ड सेंटर, रेशन कार्ड, वीज-पाणी जोडण्या, शाळा दाखले, मतदार यादी यामध्ये नवे घुसडून बेकायदेशीर घुसखोरांना मदत केली गेली. आधार कार्ड सेंटर मालक हिंदू आणि ऑपरेटर मुसलमान अशा स्वरूपात चालवले जातात.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल: लोकसंख्येचे धक्कादायक आकडे

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या (TISS) एका अहवालानुसार:

१९६१ मध्ये मुंबईत हिंदू लोकसंख्या ८८% होती.

२०११ मध्ये ती ६६% पर्यंत घसरली.

२०५१ पर्यंत ती केवळ ५४% राहील.

मुस्लिम लोकसंख्या ८% वरून ३०% पर्यंत वाढेल.

या बदलाचे प्रमुख कारण बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची वाढती संख्या आहे. या घुसखोरांना राजकीय संरक्षण मिळते असे अहवालात नमूद आहे. बनावट आधार, रेशन कार्ड, मतदार कार्ड बनवून त्यांना कायदेशीर नागरिक बनवले जाते. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार, मुंबईत दर दोन वॉर्डमागे एक मुस्लिम बहुल वॉर्ड निर्माण होत आहे.

लँड जिहादच्या पद्धती

१. गलिच्छ वस्ती पुनर्वसन योजनेचा दुरुपयोग: सरकारी जागा स्लम म्हणून दाखवणे, डेव्हलपरला फायदा देणे, खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवणे.

२. अवैध कब्जा: ओसाड इमारती, खासगी जागा, मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षित जागा बळकावणे.

३. घुसखोरांना वसवणे: बांगलादेशी घुसखोरांच्या लोंढ्यांना मुंबई आणणे, त्यांना घरे आणि व्यवसाय देणे.

४. घुसखोरांना बनावट कागदपत्र बनवून देण्याचे जाळे: बनावट आधार, रेशन, मतदार कार्ड.

५. राजकीय-धार्मिक संरक्षण: आमदार, खासदार, इस्लामिक संस्था आणि गट यांचे नेटवर्क.मुंबईत मालाड, विक्रोळी, घाटकोपर, कुरला, वर्सोवा इत्यादी भागांत हे पॅटर्न सक्रिय आहे. शीव, जुहू, वरळी येथेही गलिच्छ वस्ती पुनर्वसन योजनेतील घोटाळे उघडकीस आले आहेत. एका अंदाजानुसार हजारो कोटींच्या मालमत्ता असे घोटाळे करून हडप करण्यात आल्या आहेत.

वोट जिहाद आणि राजकीय फायदे

बेकायदेशीर घुसखोरांना मतदार बनवून एकगठ्ठा मुस्लिम मतदान सुनिश्चित केले जाते. मुसलमानांच्या एकगठ्ठा मतदानामुळे मुस्लिमलोलुप पक्षांना सत्ता मिळते.

मुंबईतील इतर समान प्रकरणे

मालवणी: लाखो अवैध वस्त्या, रोहिंग्या-बांगलादेशी वसाहत.

घाटकोपर: किरीट सोमय्या यांनी जिहादी माफियाविरुद्ध आवाज उठवला.

बांद्रा, कुर्ला: रेल्वे स्टेशन परिसरात लँड जिहाद.

जुहू, सायन: मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत घोटाळे (₹१२०० कोटी+).

या सर्वांत राजकीय नेते, भूमाफिया आणि घुसखोर यांचे त्रिकूट सक्रिय आहे असा आरोप केला जातो.

मुंबई ही हिंदू-मराठी संस्कृतीची राजधानी आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू बहुसंख्यकत्व धोक्यात येऊ शकते. विक्रोळीतील फिरोज लाला प्रकरण हे केवळ एक घोटाळा नाही, तर मुंबईवर होणाऱ्या सांस्कृतिक-लोकसंख्यिक आक्रमणाचे प्रतीक आहे. किरीट सोमय्या सारख्या नेत्यांनी उघड केलेल्या या प्रकरणांची तातडीने चौकशी व्हावी, अवैध घुसखोर हद्दपार व्हावेत आणि सरकारी जागा मोकळ्या कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी नागरिक करत आहेत. मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक हिंदू-मराठी नागरिकाने जागृत राहणे गरजेचे आहे.

मुंबईतील लँड जिहाद, घुसखोरी आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल यासंबंधी संख्यात्मक माहिती
क्र. विषय / प्रकरण संख्यात्मक माहिती स्रोत / संदर्भ
1 फिरोज लालाने विक्रोळीत हडपलेली मालमत्ता ₹५०० कोटींची सरकारी (महानगरपालिकेची) मालमत्ता किरीट सोमय्या, ३० मे २०२६
2 मालवणी भागाचे क्षेत्रफळ सुमारे १२०० एकर मालवणी पॅटर्न रिपोर्ट्स
3 हिंदूंची लोकसंख्या (१९६१) ८८% TISS अहवाल
4 हिंदूंची लोकसंख्या (२०११) ६६% TISS अहवाल
5 हिंदूंची लोकसंख्या (२०५१ अंदाज) केवळ ५४% TISS अहवाल
6 मुस्लिम लोकसंख्या (१९६१) ८% TISS अहवाल
7 मुस्लिम लोकसंख्या (२०५१ अंदाज) ३०% TISS अहवाल
8 मुस्लिम बहुल वॉर्ड्स दर दोन वॉर्डमागे एक TISS अहवाल
9 गवनि घोटाळ्यांचा एकूण अंदाज हजारो कोटी रुपये विविध गवनि प्रकरणे (विक्रोळी, जुहू, सायन इ.)
10 जुहू-सायन महानगरपालिका कर्मचारी वसाहत घोटाळा ₹१२०० कोटी+ महानगरपालिका घोटाळा रिपोर्ट्स
11 अस्लाम शेख यांचा पालकमंत्री पदाचा कालावधी जानेवारी २०२० ते जून २०२२ (२.५ वर्षे) उद्धव ठाकरे सरकार
12 मालवणीतील अवैध वस्त्या लाखो (लाखोंच्या संख्येत) मालवणी पॅटर्न रिपोर्ट्स
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
311,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा