28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषपंडित हरिप्रसाद चौरसिया यांना 'लता मंगेशकर पुरस्कार'

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’

Related

प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट/नाटक/संगीत यांचे समीक्षण करणा-यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच गुरुबाबा औसेकर महाराज यांना कीर्तन/प्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास दिला जाणारा ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ २०१९-२० साठी आतांबर शिरढोणकर यांना तर २०२०-२१ चा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

कॉन्सर्टमध्ये गात असतानाच गायक के के यांचे निधन

पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी १९६२ पासून, विद्वान श्रीमती अन्नपूर्णा देवी यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. पंडित चौरसिया हे एकीकडे परंपरावादी आहेत तर दुसरीकडे नवीन निर्माते आहेत. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त, त्यांनी भारतीय लोकसंगीत , पॉप संगीत आणि पाश्चिमात्य संगीतात आपले खेळाचे क्षेत्र वाढवले ​​आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा