28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामाराजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू

राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संयोजक रत्ना सोनी यांच्यावर राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही हिंदू संघटनांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली होती. त्यामुळे खबरदारीच्या उपाय म्हणून संपूर्ण शहरात अलर्ट जारी करण्यात आला असून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काची बस्ती परिसरात घडली. एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना दुसऱ्या समाजातील तीन-चार तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या. यानंतर उदयपूरच्या रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदू पक्षाच्या लोकांनी शहरातील सुभाष चौकात रास्ता रोको करून आरोपींच्या अटकेची मागणी केली.

हे ही वाचा:

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

कॉन्सर्टमध्ये गात असतानाच गायक के के यांचे निधन

पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान

तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

खबरदारीचा उपाय म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी केली जात आहे. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा