अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत शनिवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यंदा सलग आठव्यांदा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षीप्रमाणे आताही त्यांनी नेसलेल्या साडीची सर्वत्र चर्चा होती. प्रत्येकवर्षी त्यांच्या साडीतून आणि साडीच्या रंगातून विशेष संदेश दिला जातो.
यंदा बिहारच्या मधुबनी हस्तकला कलेने बनवलेल्या साडीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षी अर्थमंत्री विविध साड्या परिधान करून भारतातील समृद्ध हस्तकला कला वस्त्रोद्योगाचा वारसा दर्शवतात. या वर्षी त्यांनी गोल्डन वर्क असलेली पांढरी साडी नेसली होती. मधुबनी कलेचा सन्मान म्हणून त्यांनी ही साडी परिधान केली होती.
बिहारमधील मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटच्या एका कार्यक्रमाला अर्थमंत्री सीतारामन गेल्या असताना पद्मश्री पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी ही साडी त्यांना खास भेट दिली होती. तसेच त्यांनी ही साडी बजेटच्या दिवशी नेसावी अशी विनंतीही केली होती. मधुबनी कला आणि दुलारी देवी यांच्या सन्मानार्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ती साडी परिधान करून अर्थसंकल्प सादर केला.
बिहारच्या दुलारी देवी यांचा जीवनप्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांनी कधी हार मानली नाही. दुलारी देवी या एका मासेमारी आल्या असून तेथे चित्रकलेला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही, परंतु तिने ही कला कर्पुरी देवी यांच्याकडून शिकली. बालविवाह, एड्स आणि स्त्री भ्रूणहत्या यांसारख्या अनेक सामाजिक समस्यांबद्दल त्यांच्या चित्रांनी जनजागृती केली. आजपर्यंत दुलारी देवी यांनी १०,००० चित्रे काढली आहेत आणि ती ५० हून अधिक प्रदर्शनांमध्ये दाखवली आहेत. ही कला पुढे जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना या कलेत पारंगत केले आहे.
हे ही वाचा :
यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणार!
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!
महिला सक्षमीकरणाला बळ! महिला, SC/ST उद्योजकांसाठी २ कोटी रुपयांच्या मुदत कर्जाची घोषणा
रुग्णांसाठी मोठा दिलासा; कॅन्सर औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय!
२०१९ मध्ये अर्थमंत्र्यांनी गुलाबी मंगलगिरी सिल्क साडी नेसली होती. २०२० मध्ये, त्यांनी पिवळी रेशमी साडी परिधान केलेली जी आशा आणि समृद्धीचे प्रतीक होती. २०२१ मध्ये त्यांनी विणकाम करणाऱ्या समुदायाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाल आणि पांढरी पोचमपल्ली साडी नेसली होती. २०२२ मध्ये त्यांनी तिने तपकिरी बोमकाई साडी घातली, जी ओडिशाची साडी म्हणून प्रसिद्ध आहे. २०२३ च्या अर्थसंकल्पादरम्यान, त्यांनी काळ्या कसुती एम्ब्रॉयडरीसह कर्नाटक बनावटीची लाल सिल्क साडी नेसली होती. २०२४ मध्ये, त्यांनी कांथा एम्ब्रॉयडरी असलेली पश्चिम बंगालची निळी तुसार साडी घातली होती. निर्मला सीतारामन दरवर्षी बजेट सत्रामध्ये विविध वस्त्र कला दाखवणाऱ्या साड्या परिधान करून देशातील या कलांचा सन्मान करत असतात.