उत्तर प्रदेशमध्ये होत असलेल्या प्रयागराजमधील महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला होता. यानंतर तिला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि अनेकांनी याला तीव्र विरोध देखील केला होता. अखेर ममता कुलकर्णी हिला आता महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. तर, किन्नर आखाड्यातूनही त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीचं ममता कुलकर्णी यांनी किन्नर आखाड्यात प्रवेश केला होता. त्यांना महामंडलेश्वर पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. यावरून वाद सुरू झाला होता. यानंतर किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी कठोर कारवाई केली आहे. त्यांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले आहे. त्या सोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच दोघांचीही किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर अजय दास यांनी शुक्रवारी घोषणा केली की, किन्नर आखाड्याची पुनर्रचना केली जाईल. तसेच नवीन आचार्य महामंडलेश्वर यांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. एका स्त्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर कसे केले जाऊ शकते, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा :
महाकुंभ: अमृत स्नानाच्या दिवशी व्हीआयपी प्रवेशावर बंदी!
यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवा आत्मविश्वास, ऊर्जा देईल
हमासकडून सहा महिन्यांनंतर लष्करी नेता मोहम्मद डिफच्या मृत्यूची पुष्टी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; १६ विधेयके सूचीबद्ध!
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये ममता कुलकर्णी हिने पिंडदान करत संन्यास घेतला होता. त्यानंतर तिला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आलं. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं होतं. मात्र, यानंतर इतर साधूसंतांनी प्रश्न उपस्थित केले होते की, एका महिलेला किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर कसे बनवण्यात आले. हा वाद चांगलाच पेटला होता. यावर अखेर संस्थापकांनी कारवाई केली आहे.