हिंदी भाषेवरून सध्या राज्यात वाद सुरू असून विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची तारीख जाहीर केली असून ६ आणि ७ जुलै रोजी मोर्चा हा मोर्चा असणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या मोर्चेवरुन सत्ताधारी नेत्यांनी टीका केली आहे. हिंदी भाषा सक्तीची नसून ती ऐच्छिक आहे, मात्र विरोधी पक्षांकडून याचे राजकारण केले जात असल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अमित साटम यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. अमित साटम यांनी नाव घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
अमित साटम म्हणाले, आज मराठीच्या नावानं राजकरण करण्याकरिता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता जे मोर्चे काढण्याच्या गप्पा करत आहेत. त्यांनी कृपया हे सांगावं की त्यांची मुलं ही कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकली व त्यांनी शाळेमध्ये तसेच कॉलेजमध्ये असताना मराठीला सोडून कोणत्या कोणत्या विदेशी भाषा निवडल्या होत्या?.
हे ही वाचा :
कोलकात्यात विद्यार्थीनीवरील बलात्कारात तृणमूल नेता!
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू, एकाचा खात्मा!
कर्नाटकातील चामराजनगरमध्ये एकाच दिवसात ५ वाघांचा मृत्यू!
मनू भाकर घडवणारा महान मार्गदर्शक!
दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट करावे की आमच्या राज्यात हिंदी भाषा लागू केली जाणार नाही. ७ जुलै रोजी मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन होईल. शिवसेना त्यात सहभागी होईल. २९ जून रोजी मुंबईत हिंदी भाषाविरोधी आंदोलनाची बैठक होईल. यावेळी दोनही नेत्यांनी मोर्चेत सहभागी होण्याचे लोकांना आवाहन केले आहे.
राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबाकरिता इंग्रजी व इतर विदेशी भाषा.
आज मराठीच्या नावानं राजकरण करण्याकरिता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरिता जे मोर्चे काढण्याच्या गप्पा करत आहेत त्यांनी कृपया हे सांगावं की त्यांची मुलं ही कुठल्या माध्यमाच्या शाळेत… pic.twitter.com/0io4kUZbCC
— Ameet Satam (@AmeetSatam) June 27, 2025
