29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषमेधा पाटकर यांच्यामागे लागणार ईडीचा ससेमिरा? पाटकर म्हणाल्या...

मेधा पाटकर यांच्यामागे लागणार ईडीचा ससेमिरा? पाटकर म्हणाल्या…

Google News Follow

Related

नर्मदा बचाव आंदोलनाच्या नावाखाली विकास कामांना विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे संजीव झा यांच्या तक्रारीवरून मेधा पाटकर यांच्या नर्मदा नवनिर्माण अभियान या संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२००५ साली नर्मदा बचाव आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून राजकीय षड्यंत्र चालवण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. देशभर सुरू असलेल्या ईडीच्या धडक कारवाईमध्ये आता मेधा पाटकर आणि त्यांची सामाजिक संस्था देखील अडचणीत आली आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून सुरुवातीला गुन्हा दाखल केल्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले जात होते. पण आता मेधा पाटकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आमच्यावर होत असलेली कारवाई चुकीची असून आमच्या कार्याला बदनाम करण्याचा कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे गेल्या काही वर्षांपासून आम्ही तीन राज्यांमध्ये कार्यरत आहोत. नर्मदेच्या खोऱ्यात काम करत आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर कार्यरत असलेल्या या अभियानाबद्दल ही खळबळजनक बातमी गेल्या तीन-चार दिवसांपासून पसरवण्यात येत आहे. पण आमच्यावर जो आरोप लावण्यात आलाय तो धादांत खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

विक्रांत घोटाळ्याचे पुरावे राऊतांनीच द्यावेत! पण त्यांच्याकडे कागदोपत्री कोणताच पुरावा नाही

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

लेक्चरदरम्यान हिंदू देवतांचा अपमान करणारा प्रोफेसर निलंबित

वसंत मोरेंची मनसे पुणे शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी! भोंग्यांबाबतची भूमिका भोवली?

आम्हाला २० लोकांकडून एकाच दिवशी एकच राशी प्राप्त झाल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आमच्याकडील कागदपत्रांवरून हे सिद्ध होत नाही. ही राशी आम्हाला कुठे मिळाल्याचेही आम्हाला आढळून आले नाही. असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. याबरोबरच माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगसमूहाने आम्हाला जी राशी दिली त्याबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या शिफारसीनुसार सहयोग राशी दिल्याचे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात जी काही चौकशी होईल त्याला सामोरे जायला तयार असून चौकशीला पूर्ण सहकार्य करू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तर या विरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा