29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषरेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे... मोदींनी मराठीत महाराष्ट्राला केले संबोधित

रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे… मोदींनी मराठीत महाराष्ट्राला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखविला वंदे भारतला हिरवा झेंडा

Google News Follow

Related

रेल्वेच्या क्षेत्रात क्रांती होत आहे. देशाला आज ९वी आणि १०वी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी मुंबई व महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषणाची सुरुवात करून वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राला संबोधित केले. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत रेल्वेंना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखविला.

ते म्हणाले की, आज पहिल्यांदा दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत.  कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे, व्यवसायासाठी, शेतकऱ्यांसाठी श्रद्धाळूंसाठी या गाडीमुळे सुविधा मिळेल. ही महाराष्ट्रात पर्यटन व तीर्थयात्रेला अधिक गती देईल. शिर्डीत साईबाबा दर्शन करायचे असेल किंवा नाशिक रामकुंड, त्र्यंबकेश्वर दर्शन करायचे असेल वंदे भारत ट्रेनमुळे हे सगळे सोपे होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अशा पद्धतीने मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनने विठ्ठल रखुमाई, सिद्धेश्वर, अक्कलकोट स्वामी समर्थ व आई तुळजा भवानीचे दर्शन सगळ्यांना सुलभ होईल. मुंबई महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. वंदे भारत ट्रेन ही आधुनिक होणाऱ्या भारताची छबी आहे. भारताचा वेग, दर्जा दोघांचे प्रतिबिंब आहे. किती वेगाने देश वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. आतापर्यंत १० ट्रेन्स सुरू झाल्या आहेत. आज देशातील १७ राज्यांतील १०८ जिल्हे वंदे भारतने जोडले आहेत. मला आठवते की, एक जमाना होता की, खासदार चिठ्ठी लिहित असत, की आमच्या क्षेत्रात ट्रेनला थांबवा १-२ मिनिटांचा थांबा द्या. आता सगळे खासदार भेटतात तेव्हा ट्रेन आमच्या इथेही यावी, अशी मागणी करतात.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

भारत,चीन,इराण दूतावासांवर हल्ला करण्याची धमकी

पंतप्रधान दौऱ्याआधी उपमुख्यमंत्र्यांनी सीएसएमटी स्थानकाची केली पाहणी

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

मोदी म्हणाले की, मुंबईच्या लोकांचे जीवन सहज बनविणारे प्रोजेक्ट एलिव्हेटेड कॉरिडोरचे लोकार्पण इस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीची कमी पूर्ण करणार आहे. मुंबईला याची प्रतीक्षा होती. या कॉरिडोरमुळे २ लाखपेक्षा अधिक गाड्या जाणार आहेत लोकांचा वेळ वाचेल. कुरार अंडरपासही महत्त्वाचा आहे. आता मुंबईकरांना या परियोजना पूर्ण होत असल्याबद्दल अभिनंदन करतो. पब्लिस ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुधारली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचे जीवनमान सुधारेल. याच विचारातून देशात आधुनिक ट्रेन्स चालविल्या जात आहेत. मेट्रोचा विस्तार होत आहे. एअरपोर्ट व पोर्टस बनविले जात आहेत. देशाच्या अर्थसंकल्पात याच भावनेची दखल घेण्यात आली आहे. १० लाख कोटी पायाभूत सुविधांसाठी ठेवण्यात आले आहेत. ९ वर्षांच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. रेल्वेचा हिस्सा २.५ लाख कोटींचा आहे. महाराष्ट्रात रेल्वे बजेटमध्ये वृद्धी झाली आहे. डबल इंजीनमुळे कनेक्टिव्हिटी आधुनिक बनेल. प्रत्येक रुपया नव्या रोजगाराची संधी देईल. सीमेंट, वाळू, लोखंड मशिन्स आवश्यक असतात यातीह प्रत्येक इंडस्ट्रीला बळ मिळते. सगळ्यांना त्याचा लाभ होतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा