29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषघर घेता का घर! नव्या घरांना मिळतेय पसंती

घर घेता का घर! नव्या घरांना मिळतेय पसंती

Google News Follow

Related

कोरोना काळामध्येही अनेकांची घरे घेण्याची ऐपत वाढतच आहे. एकट्या मुंबई शहरामध्ये घरांच्या दाखल होण्याच्या एकूणच प्रक्रियेमध्ये जवळपास ३३ टक्के वाढ झालेली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे खिसा गरम असल्याकारणाने आता ५० लाखांपासून ते १ कोटी किमतीच्या घरांचा समावेश झालेला आहे. भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलच्या सर्वेक्षणानुसार २०२१ या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान ४ हजार ६१६ नवीन घरे व फ्लॅट बाजारात सादर झाले आहेत. तसेच हा आकाडा तिमाहीत अधिक वाढलेला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, नवीन घरांमध्ये सर्वाधिक २५ टक्के भागीदारी ही पूर्व उपनगरांची होती. त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरांमध्ये २२ टक्के घरांचा समावेश होता. सर्वेक्षणानुसार लाल बहाद्दूर शास्त्री म्हणजेच एलबीएस मार्गाला सर्वाधिक मागणी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच गुंतवणुकीसाठी आता अनेकजण कांजूरमार्ग ते मुलुंड हे सर्वोत्तम स्थळ झालेले आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे एलबीएसमार्गकडे अनेकांचा ओढा दिसून येत आहे.

जून-जुलै दरम्यान जेएलएलचे होमबॉयअर प्राधान्य सर्वेक्षण, ज्यात मुंबई, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, पुणे, चेन्नई आणि हैदराबादमधील २५०० व्यावसायिकांचा सहभाग होता. सर्वेक्षणानुसार ३५ वर्षांवरील ग्राहकांनी पुढील सहा महिन्यांत मालमत्ता खरेदी करण्याकडे अधिक कल असल्याचे सूचित केले आहे.

तसेच, ५०% पेक्षा जास्त भावी घर खरेदीदारांनी २ बीएचके अपार्टमेंट ८०० ते १००० चौरस फूट आकाराचे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे.

हे ही वाचा:

होल ‘हिंग’ इज दॅट की भैय्या…

शाळांसाठी पालिकेने घेतला ‘टॅब’डतोब निर्णय

‘रेशमाच्या रेघांनी’वर थिरकले राष्ट्रवादीचे गॅसदरवाढीचे आंदोलन

‘हरवलेल्या’ पतीचा खून झाल्याचे अखेर झाले उघड

सर्वेक्षणानुसार रिअल इस्टेट आजच्या घडीला सर्वात लवचिक मालमत्ता वर्ग म्हणून उदयास आली आहे. परवडणारी घरं आणि त्याखालोखाल घरांमुळे हा बाजार सुरु आहे. ५०-७५ लाख श्रेणीतील मालमत्तांना प्राधान्य दिले जात असल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. तसेच लोकांची गरज ओळखूनच आता डेव्हलपर्सनीही त्यांच्या उत्पादनांची पुनर्रचना केलेली निदर्शनास येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा