28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरराजकारणएकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, नारायण राणेंचा दावा

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, नारायण राणेंचा दावा

Related

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेमध्ये बोलताना एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत ते केवळ सही पुरतेच मंत्री आहेत असे राणे यांनी म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्यात घेऊ असा दावा राणे यांनी केला आहे नारायण राणे यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात फिरत आहेत. गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी या यात्रेला सुरुवात झाली. आज या यात्रेचा तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस मुंबई मध्ये फिरल्यानंतरजन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी राणे हे वसई-विरार भागात नागरिकांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर सरसंधान साधले आहे. यावेळी राणे यांच्या निशाण्यावर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते आणि जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे होते.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…

मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

एकनाथ शिंदे हे मंत्री असले तरी ते फक्त सही पुरतेच मंत्री आहेत. ते मातोश्री शिवाय एकही सही करू शकत नाहीत असे विधान राणे यांनी केले आहे. शिवसेनेत ते कंटाळले आहेत असा दावाही राणे यांनी केला. तर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना घेऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. तर आमच्या मनात आले तर लवकरात लवकर ठाकरे सरकारचे विसर्जन करू असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा