29 C
Mumbai
Sunday, March 23, 2025
घरविशेषअहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी!

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी!

ग्रामसभेत ठराव मंजूर

Google News Follow

Related

महाकुंभ मेळ्यात मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी केली असताना त्याचप्रमाणे कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये देखील मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ गावच्या ग्राम पंचायतीने याबाबतचा ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे. मढी गावाचे सरपंच संजय मरकड यांनी ही माहिती दिली. या ठरावानंतर मढी गावाची राज्यभरात चर्चा होत आहे.

‘मढी’ गावात कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. होळी पासून गुढी पाडव्यापर्यंत ही यात्रा सुरु असते. हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तेलकट पदार्थ तळणे, लग्न कार्य, शेतीकामे, प्रवास अशा प्रकारची कामे पूर्णपणे बंद करतात. त्याच बरोबर घरातील पलंग, खाटेवर बसणे टाळतात.

परंतु, यात्रेला येणारे मुस्लीम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे.  त्यामुळे यात्रेदरम्यान येणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबात गावात पार पडलेल्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

दहशतवादी करणार होते चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांचे अपहरण

युक्रेन- रशियाच्या युद्धाची तीन वर्षे: अर्थव्यवस्थेवर काय झालाय परिणाम?

यूएसएआयडीने मंजूर केलेले प्रकल्प सरकारच्या भागीदारीत

महाकुंभबद्दल अफवा : ३१ सोशल मीडिया खात्यांविरोधात एफआयआर

दरम्यान, ‘मढी’ गावाने घेतलेल्या निर्णयाचे भाजापा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी स्वागत केले आहे. ट्वीटकरत ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘मढी’ च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी घालण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा अत्यंत धाडसी आणि आवश्यक निर्णय घेतल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, सरपंच व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील अन्य देवस्थाने व गावांनी सुद्धा हा निर्णय लागू करावा आणि आपल्या सनातन परंपरांना दूषित होण्यापासून वाचवावे, असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा