संभलचे सीओ (सर्कल ऑफिसर) अनुज चौधरी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी होळी आणि रमजानच्या जुम्मा नमाजावर भाष्य करताना विधान केले आहे. हे त्यांचे वक्तव्य समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ते म्हणाले, जुम्मा वर्षभरात ५२ वेळा येतो, पण होळी फक्त एकदाच येते. जर कोणत्या मुस्लिम व्यक्तीला होळीच्या रंगामुळे त्रास होत असेल, तर त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडू नये. जर बाहेर पडलेच, तर त्यांचे मन मोठे असले पाहिजे आणि त्यांनी सर्वांना समान समजले पाहिजे.
रंग म्हणजे फक्त रंगच आहे. जसे मुस्लिम बांधव वर्षभर ईदची वाट पाहतात. तसेच हिंदू समाजही होळीची प्रतीक्षा करतो. होळी ही आनंदाचा सण आहे. ती रंग उधळून, गोडधोड खाऊन, ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत साजरी केली जाते. अनुज चौधरी यांनी पुढे सांगितले की, ईदच्या दिवशी लोक शेवया बनवतात, एकमेकांची गळाभेट घेतात. घरी बोलावतात. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी दोन्ही समाजांनी एकमेकांचा सन्मान करावा.
हेही वाचा..
तहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!
दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले ‘चोकर्स’
नौदलात सामील होण्यासाठी २,९७२ अग्निवीर सज्ज
काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात आवाज उठू लागला
कोणीही कोणावर जबरदस्तीने रंग लावू नये. जर कोणत्या हिंदू व्यक्तीला देखील रंग नको असेल तर त्याचाही सन्मान केला पाहिजे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर कोणालाही होळीच्या रंगांपासून त्रास होत असेल, तर त्यांनी त्या दिवशी घरातच थांबावे. असे केल्याने शांतता कायम राहील आणि सकारात्मक संदेश जाईल. संभल प्रशासन कोणत्याही समुदायाकडून होणारी अराजकता सहन करणार नाही आणि शिस्तभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.