29.6 C
Mumbai
Wednesday, April 23, 2025
घरक्राईमनामातहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!

तहव्वूर राणाची तंतरली, म्हणतो, भारतात पाठवू नका, छळ करून मारतील!

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पणावर तात्काळ स्थगितीची मागणी

Google News Follow

Related

मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणावर तात्काळ स्थगिती मागितली आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानेही याला हिरवा कंदील दाखवला होता. तहव्वूर राणा याचे म्हणणे आहे की, त्याच्या राष्ट्रीय, धार्मिक आणि सामाजिक ओळखीमुळे भारतात त्याचा छळ केला जाईल आणि त्याला ठार केले जाईल.

दहशतवादी तहव्वूर राणा याने याचिकेत म्हटले आहे की, तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे आणि पाकिस्तानी सैन्याचा माजी सदस्य आहे, ज्यामुळे त्याला कोठडीत छळ सहन करावा लागू शकतो आणि शिवाय त्याच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. राणाने असा दावा केला आहे की, त्याला पोटाचा विकार (abdominal aortic aneurysm) असून त्यामुळे मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्याने पुढे आरोप केला आहे की, भारत सरकार हुकूमशाही करत आहे. यासाठी त्याने ह्यूमन राईट्स वॉच २०२३ वर्ल्ड रिपोर्टचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लिमांवर भेदभाव केल्याचा आरोप आहे.

अमेरिकेने तहव्वूर राणाच्या भारत प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. तसेच निर्णय जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला अत्यंत वाईट म्हटले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याला मंजुरी मिळाली होती. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती.

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला लॉस एंजेलिस तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एफबीआयने राणाला २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे, ज्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या गटाने हा हल्ला केला. हेडली या हल्ल्यातील सहभागासाठी अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.

हे ही वाचा..

झारखंड विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाबुलाल मरांडी

काँग्रेसमध्ये घराणेशाहीविरोधात आवाज उठू लागला

मुस्लिम संघटनेची मागणी, तेलुगू भाषेतील ‘छावा’चे प्रदर्शन थांबवा!

भय्याजी जोशी म्हणाले, ‘मुंबईची भाषा मराठीच, यात दुमत नाही’

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाने केलेले अपील अमेरिकन कोर्टाने १५ ऑगस्ट रोजी फेटाळले होते. तसेच दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा