27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषतुर्की, अझरबैजानवर बहिष्कार मोहिमेला ‘इझमायट्रिप’चा पाठींबा

तुर्की, अझरबैजानवर बहिष्कार मोहिमेला ‘इझमायट्रिप’चा पाठींबा

‘इझमायट्रिप’चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी मांडली भूमिका

Google News Follow

Related

भारतासोबतच्या संघर्षात तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतात रोष पसरला असून याचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. या दोन्ही देशांमधील वस्तूंवर भारतात बहिष्कार टाकण्यात येत असून पर्यटकांनीही इथे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर ‘इझमायट्रिप’चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी भाष्य केले आहे. पिट्टी यांनी म्हटले की, राष्ट्रीय हित प्रथम येते आणि व्यावसायिक हित नंतर येते. त्यांनी तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला पाठींबा दर्शवला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर भारताविरुद्ध सीमापार दहशतवादाला पाठिंबा देऊन तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहून भारतविरोधी भूमिका घेतली. भारत- पाकिस्तान तणावावरील आपल्या निवेदनात अझरबैजानने पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केले. तुर्कीने पाकिस्तानसोबत एकता व्यक्त केली आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय चौकशीच्या इस्लामाबादच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. तुर्कीने पाकिस्तानला लष्करी शस्त्रे देखील पुरवली आहेत. यानंतर भारतात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

“एक कंपनी म्हणून, ‘इझमायट्रिप’ नेहमीच राष्ट्राचा विचार प्रथम करतो आणि व्यवसायाचा नंतर,” असे प्रशांत पिट्टी यांनी म्हटले आहे. यापूर्वीही २०२४ च्या सुरुवातीला, ‘इझमायट्रिप’ने भारत आणि मालदीवचे संबंध बिघडल्यानंतर मालदीवसाठी बुकिंग रद्द केले होते. राष्ट्रीय भूमिका घेतली आणि नऊ महिने मालदीवसोबत काम केले नाही, जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री मालदीवला भेटले तेव्हाच आम्ही मालदीव बुकिंग पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली, असे पिट्टी म्हणाले.

तसेच, सध्या ज्या घटना घडत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू असून अझरबैजान आणि तुर्कीसारखे देश हे चुकीच्या बाजूला उभे असल्याचे आपण पाहत आहोत. संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्य आणि जवान उपस्थित असल्याचे जगाने पाहिले. जगाला आणखी काय पुरावा हवा आहे? तरीही काही देश आहेत जे पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी ड्रोन पुरवत आहेत. प्रवास सल्लागार म्हणून, आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना तुर्की आणि अझरबैजानला प्रवास करू नये म्हणून प्रवास सल्लागार जारी करण्याचा निर्णय घेतला आहे कारण ते आपल्या विरोधात उभे राहणार आहेत,” असे ‘इझमायट्रिप’चे सह-संस्थापक प्रशांत पिट्टी यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा..

चुकीची माहिती पसरवल्याबद्दल तुर्कीच्या TRT World चे एक्स हँडल ब्लॉक

छोट्या ड्रोनना शोधून टिपणारे ‘भार्गवस्त्र’ भारताच्या भात्यात

मराठमोळ्या सरन्यायाधीशांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

पाकिस्तान समर्थनात पोस्ट करणाऱ्याला देशभक्तीचा धडा

पिट्टी म्हणाले की, तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार मोहीम सुरू झाल्यापासून, २२ टक्के लोकांनी तुर्कीला जाणारी त्यांची बुकिंग रद्द केली आहे. तर, ३० टक्के लोकांनी अझरबैजानला जाणारी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे, असे पिट्टी म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा