पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आठ वाजता राष्ट्राला संबोधित केले. मोदींचे रात्रीचा आठ वाजता भाषण म्हटलं की, अनेकांच्या छातीत धडकी भरते. परंतु काल मोदी काय बोलणार, याचा साधारणपणे अंदाज होता. मोदींचे भाषण ऐतिहासिक होते. सुस्पष्ट आणि धारधार होते. देशाच्या सेनादलांचे अभिनंदन करताना वैज्ञानिकांनाही त्यांनी धन्यवाद दिले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात तथाकथित विजयाचे ढोल बडवताना, अमेरिका, चीन, ओमान, कतार, सौदी, इराण, तमाम देशांचे त्यांनी आभार मानले. परंतु मोदींच्या भाषणात ट्रम्प यांच्यासह एकाही नेत्याचा, एकाही देशाचा उल्लेख नव्हता. मोदीचे भाषण काल सगळे जग कान टवकारून ऐकत होते. कारण हा उगवत्या महासत्तेचा हुंकार होता.
