भारतासोबतच्या वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालदीवच्या विरोधी पक्षाचे (मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी) नेते अली अझीम यांनी म्हटले आहे की, आपल्याला देशाचे परराष्ट्र धोरण मजबूत ठेवावे लागेल.
पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी मालदीवच्या मंत्र्यांकडून करण्यात आली होती. मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले.सध्या भारत आणि मालदिवमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर #बॉयकॉट मालदिव हा हॅशटॅग ट्रेन्डमध्ये आहे.मालदिवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यावर या वादाला सुरुवात झाली.अनेक भारतीय पर्यटकांनी मालदिवचे बुकिंग रद्द केल्याचे सांगितले जात आहे.सेलिब्रेटिनींही परदेशी ठिकाणांपेक्षा भारतातील बेटे आणि समुद्रकिनाऱ्यावर नक्की भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
उरी हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेवरून अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
रामजन्मभूमीचे टाळे उघडून देणाऱ्या न्यायाधीशांना पाकमधून येत असत धमक्या
ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांच्या घरात ईडी
मोदींनी म्हटले, हरिहरन यांच्या रामभजनाचा आस्वाद घ्या!
भारत- मालदीव वादानंतर मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी होत आहे.मालदीवच्या विरोधी पक्षाचे (मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी) नेते अली अझीम यांनी ट्विटरवर पोस्ट करत राष्ट्राध्यक्ष मुइज्जू याना हटवण्याचे आवाहन केले आहे.त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आपल्याला देशाचे परराष्ट्र धोरण मजबूत ठेवावे लागेल. शेजारील देशांना तुटण्यापासून वाचवायचे आहे, असे त्यांनी लिहिले आहे. यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाला विचारले की ते मुइज्जूला हटवण्यास तयार आहेत का?. त्यांनी पुढे विचारले- मालदीव डेमोक्रॅटिक पक्ष मुइज्जू विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणेल का?.
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्र्यांनीही भारताला पाठिंबा दिला
भारत-मालदीव वादावर मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष मुइज यांच्या प्रशासनाचे हे अपयश आहे.ते पुढे म्हणाल्या की, आपण एक छोटा देश आहोत. आपल्या सीमा भारताशी आहेत हे आपण नाकारू शकत नाही.मारिया अहमद म्हणाल्या- आमच्या सुरक्षेची चिंता सारखीच आहे. भारताने आम्हाला नेहमीच मदत केली आहे. संरक्षण क्षेत्र असो किंवा आम्हाला उपकरणे पुरवणे असो, भारताने आम्हाला अधिक सक्षम बनवण्याच्या प्रयत्नात मदत केली आहे.