स्टार्टअप फाउंडर आणि एंजेल-वन इन्व्हेस्टर उदित गोयनका यांनी ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी स्विगीवर गंभीर आरोप केला आहे की त्यांनी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली असताना त्यांना बेहरोज बिर्याणी रेस्टॉरंटकडून नॉन-व्हेज बिर्याणी पाठवण्यात आली. गोयनका यांनी सोशल मीडियावर X वर पोस्ट करत नॉन-व्हेज बिर्याणीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “मी बेहरोजकडून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती, पण मला नॉन-व्हेज बिर्याणी मिळाली.”
त्यांनी स्विगी आणि Swiggy Care यांना टॅग करत सांगितले की त्यांनी हे प्रकरण सोडवलं नाही तर ते कंझ्युमर कोर्टात जाणार आहेत. गोयनका यांनी बेहरोज बिर्याणीवरही नाराजी व्यक्त केली आणि लिहिले, “तुम्ही लोक भयंकर निकृष्ट आहात. या घटनेबद्दल मी तुमच्यावर केस दाखल करीन.” त्यांची ही पोस्ट X वर झपाट्याने व्हायरल झाली असून आतापर्यंत १.२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा..
श्रीलंकन नौदलाकडून तमिळनाडूच्या ३५ मच्छीमारांना अटक
एनडीएची ओळख विकासाशी, राजद-काँग्रेसची ओळख विनाशाशी
ब्रिटीश नागरिकत्व, भारतात इस्लामचा प्रचार; मौलाना शमसुल हुदा खान विरुद्ध एफआयआर
असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द
सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी गोयनकांना सुचवले की बेहरोज हे रेस्टॉरंट प्रामुख्याने नॉन-व्हेज बिर्याणीसाठी ओळखले जाते, त्यामुळे तेथे शुद्ध शाकाहारी बिर्याणी मागवणे योग्य नव्हते. या घटनेवर बेहरोज बिर्याणीच्या अधिकृत X हँडलवरून प्रतिक्रिया देत माफी मागण्यात आली आहे. त्यांनी लिहिले, “उदित, आम्ही आमच्या ग्राहकांना असा अनुभव देत नाही. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही माफी मागतो. कृपया तुमची ऑर्डर आयडी आणि संपर्क क्रमांक आम्हाला डीएम करा, जेणेकरून आम्ही प्रकरण सोडवू शकू.”
बेहरोज बिर्याणीच्या एस्कलेशन टीमनेही गोयनकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून, त्यांचा मोबाइल क्रमांक मागवण्यात आला आहे जेणेकरून विषयाचा निपटारा करता येईल. याआधीही अशाच प्रकारचा प्रकार या वर्षी एप्रिल महिन्यात नवरात्रीच्या काळात समोर आला होता. नोएडामध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्विगीवरून व्हेज बिर्याणी मागवली होती, पण तिला जाणूनबुजून नॉन-व्हेज बिर्याणी पाठवण्यात आल्याचा आरोप केला होता. विद्यार्थिनीने दोन-तीन घास घेतल्यावरच तिला समजले की ती नॉन-व्हेज खात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित रेस्टॉरंटच्या मालकाला अटक केली होती.







