इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि आधार आर्किटेक्ट नंदन निलेकणी यांच्या मते भारतातील भाषा वैविध्यास अनुरूप आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सोल्यूशन्स आणण्याची तातडीची गरज आहे. जेणेकरून एका अब्ज भारतीयांना एआय-सक्षम डिजिटल इकॉनॉमीमध्ये सामील करता येईल. ते आर्कम व्हेंचर्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितले की, AI4भारत सारखे ओपन-सोर्स एआय मॉडेल्स भारतीय भाषांसाठी डेटासेट तयार करण्यावर काम करत आहेत, जे शेती, शिक्षण आणि आरोग्यसेवेत एआय-आधारित सेवा सक्षम करू शकतात.
सरकार ‘ओपन अॅग्री नेटवर्क’ नावाच्या उपक्रमावर काम करत आहे, जो शेतकऱ्यांना रिअल-टाइम शेतीविषयक माहिती पुरवण्यासाठी एआयचा उपयोग करेल. निलेकणी यांच्या मते, परवडणाऱ्या स्मार्टफोनच्या वाढत्या उपलब्धतेमुळेही मोठा बदल घडेल. ते म्हणाले, “हा एक मोठा बदल आहे, जिथे आम्ही एका अब्ज भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी टेक्नॉलॉजी, डीपीआय आणि एआयचा वापर करत आहोत.”
हेही वाचा..
इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने जुम्मा नमाजाची वेळ बदलली
स्टील क्षेत्रातील संशोधन, विकासाला मिळणार चालना
चार वर्षांत असाममध्ये पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ
वृंदावनच्या श्री प्रियाकांत जू मंदिरात हायड्रॉलिक होळी
त्यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या वाढत्या प्रभावावर देखील चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, “ही भारतीय स्टार्टअप्सच्या परत येण्याची योग्य वेळ आहे. यामुळे अधिक IPO आणि वेगवान विस्तार शक्य होईल.” निलेकणी पुढे म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्था ८% दराने वाढत आहे, मात्र स्टार्टअप्स २०% CAGR दराने वाढतील आणि पुढील दशकात १० लाख (१ मिलियन) स्टार्टअप्सचा आकडा गाठला जाईल.”
त्यांनी १० मिलियन एमएसएमईंना (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) टेक्नॉलॉजी, मार्केट आणि क्रेडिटमध्ये प्रवेश देण्याची गरजही अधोरेखित केली. गेल्या दशकात ‘आधार’ आणि ‘यूपीआय’ सारख्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे (DPI) भारताने मोठी तांत्रिक झेप घेतली आहे. भारतामध्ये ५०० मिलियनहून अधिक स्मार्टफोन वापरकर्ते आणि ५३० मिलियनहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत, ज्यामुळे देशाने डिजिटल क्रांतीसाठी एक मजबूत पाया तयार केला आहे.
त्यांनी जोर देऊन सांगितले, “भारताने एआयला पूर्णपणे स्वीकारण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून याचा लाभ एका अब्ज लोकांपर्यंत पोहोचू शकेल. यासाठी महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे भारतीय भाषा, एमएसएमई, शेती, आरोग्य आणि शिक्षण.”