होळीनिमित्त देशभरात उत्साह असताना रंगांची उधळण केली जात आहे. रंग, पिचकाऱ्या खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली असताना उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये विक्रीला असणारी चांदीची पिचकारी चांगलीच चर्चेत आली आहे. लखनऊमधील एका दागिन्यांच्या दुकानात खास होळीनिमित्त चांदीची पिचकारी आणि लहान चांदीच्या बादल्या विकल्या जात आहेत. चांदीच्या पिचकारी खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही बोलले जात आहे.
ज्वेलर्स दुकानदार आदेश कुमार जैन म्हणाले की, चांदीची पिचकारी आणि बादल्या होळीनिमित्त भेट देणं ही एक जुनी परंपरा आहे. नवविवाहित जोडप्याच्या कुटुंबाला ही पिचकारी भेट दिली जाते. वधूचे कुटुंब सहसा वराच्या कुटुंबाला या गोष्टी भेट म्हणून देतात. याची किंमत सुमारे ८००० ते १ लाख रुपयांपर्यंत असते. या वर्षी विशेष म्हणजे पहिल्यांदाच या पिचकारीवर गुंतागुंतीचे कोरीवकाम, मीनाकारी काम सादर करण्यात आले होते. ज्याचे ग्राहकांनी खूप कौतुक केले.
विक्रीबद्दल जैन म्हणाले की, या चांदीच्या पिचकारी आणि बादल्यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत, लखनऊमध्ये किमान १,००० पिचकारी विकल्या गेल्या आहेत. आम्ही घाऊक व्यवसाय करत असल्याने, अनेक दुकानदारांनी आमच्याकडून त्यांच्या ग्राहकांना विकण्यासाठी देखील खरेदी केली आहे. विश्वास आहे की येत्या काही वर्षांत, ही पिचकारी परंपरा आणखी लोकप्रिय होईल.
हे ही वाचा :
सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा लांबणीवर; तांत्रिक समस्येमुळे क्रू-10 चे प्रक्षेपण रद्द
रशियाने लष्करी आक्रमण सुरू ठेवल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल
जाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा
‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’
५०,००० रुपये किंमतीच्या ‘गोल्डन गुजिया’ने वेधले लक्ष
उत्तर प्रदेशातील गोंडा येथील एका मिठाई दुकानाने ‘गोल्डन गुजिया’ची कल्पना समोर आणली आहे. सणासुदीच्या काळात मिठाईच्या किंमती गगनाला भिडत असताना, ही खास मिठाई बाजारात आली आहे. ज्याची किंमत प्रति किलो ५०,००० रुपये आहे तर प्रति नग किंमत १३०० रुपये आहे. दुकानाचे व्यवस्थापक शिवकांत चतुर्वेदी यांनी सांगितले की, गोल्डन गुजियामध्ये २४ कॅरेट सोन्याचा थर आणि विशेष ड्रायफ्रूट फिलिंग आहे यामुळे ते खास असून किंमतीही त्यानुसार आहेर. पारंपारिक गुजिया हे गोड पदार्थ असून ते सामान्यतः खवा, काजू आणि सुक्या मेव्याने भरलेले असतात.