दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अश्विनी वैष्णव यांना जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्टेशनचे नाव ‘महाराजा अग्रसेन रेल्वे स्थानक’ ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याबद्दल रेखा गुप्ता म्हणतात की महाराजा अग्रसेन हे समाजसेवा, समानता आणि न्यायाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे नामकरण योग्य ठरेल. रेखा गुप्ता यांनी हे पत्र १९ जून रोजी लिहिले होते, ज्याची माहिती आता सार्वजनिक झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. तथापि, या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जुने दिल्ली रेल्वे स्टेशन हे राजधानीतील सर्वात व्यस्त आणि ऐतिहासिक रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. अलीकडेच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यमुना नदीतील प्रदूषणासाठी मागील सरकारला जबाबदार धरताना शनिवारी सांगितले की, त्यांच्या सरकारने यमुना प्रदूषणमुक्त करण्याचे, कचऱ्याचे डोंगर (ढीग) काढून टाकण्याचे आणि नाल्यांमधील गाळ काढून टाकण्याचे टार्गेट ठेवले आहे.
हे ही वाचा :
तेलंगणा फार्मा प्लांट स्फोटात मृतांची संख्या ३५ वर!
‘मराठी माणसे एकत्र येऊ नयेत म्हणून जीआर रद्द केला,’ हे फक्त उद्धव ठाकरेंना सुचू शकते!
नसीरुद्दीन शाहच्या वक्तव्यावर सिनेमे कामगार संघटनेने व्यक्त केली नाराजी
दिल्लीतील उद्योजकांनी कोसी कलान शहराजवळील कामर गावात १६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २.५ टन प्रतिदिन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्लांटचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, गाईच्या शेणामुळे होणारे यमुनेचे प्रदूषण थांबवण्यासाठी सरकार दुग्ध वसाहतींमध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवणार नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वेस्ट टू वेल्थ’ या मंत्राचा वापर करून दोन वर्षांत दिल्लीच्या गरजेनुसार गोबर गॅस प्लांट देखील उभारणार आहे. या वर्षाच्या अखेरीस दोन गोबर गॅस प्लांटच्या स्थापनेपासून याची सुरुवात होईल.
