यंदाच्या गणेश चतुर्थीमध्ये हैदराबादमध्ये एक आगळीवेगळी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित गणपतीची मूर्ती या वर्षीच्या उत्सवात साकारण्यात आली आहे. ही मूर्ती देशभक्ती आणि शौर्याचा संदेश देणारी ठरणार असून, गणेशोत्सवाच्या धार्मिक उत्साहासोबतच देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.
वायू दलाच्या जवानाच्या मूर्तीरुपात असणारा हा बाप्पा लवकरच आपल्या भक्तांना भेटायला येणार आहे. मृषकराज देखील जवानाच्या मूर्तीरुपात आहेत. यासह भारतीय सैनिक, हेलिकॉप्टर आणि बचाव कार्याचे दृश्य साकारण्यात आले आहे. भारताचे घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्र देखील दाखवण्यात आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही थीम वापरून अनेक ठिकाणी भारतीय लष्कराच्या पराक्रमाची झलक दाखवण्यात आली आहे. मूर्तीच्या पार्श्वभूमीत हिमालयातील भाग आणि धोकादायक परिस्थितीतून बचाव करत असलेल्या जवानांचे चित्रण करण्यात आले आहे. आयोजकांचे म्हणणे आहे की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून समाजप्रबोधन आणि देशप्रेम जागवण्याचीही संधी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने देशाला अभिमान वाटावा असा संदेश द्यायचा आहे.”
हैदराबादमधील या खास गणेश मूर्तीमुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावरही याची छायाचित्रं आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Operation Sindoor-themed Ganesh Idol to be showcased in Hyderabad's Ganesh Chaturthi celebrations
Read @ANI Story | https://t.co/BtknVUHQEK#OperationSindoor #GaneshIdol #Hyderabad #GaneshChaturthi pic.twitter.com/4DogjjODhk
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2025







