27 C
Mumbai
Saturday, September 14, 2024
घरविशेष'बागेश्वर बाबां'च्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध!

‘बागेश्वर बाबां’च्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध!

अंनिसकडून कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी

Google News Follow

Related

अध्यात्मिक गुरु धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर यांचा संभाजी नगर शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच बागेश्वर बाबांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील अंनिसकडून करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड व छत्रपती संभाजीनगर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निवेदन देण्यात आले आहे.

अध्यात्मिक गुरु बागेश्वर बाबा यांचा संभाजी नगर शहरात ०६ ते ०८ नोव्हेंबर या कालावधीत कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.यासाठी जागो जागी डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले आहेत. फ्लेक्समध्ये केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचा देखील फोटो दिसून येत आहे.शहरातील अयोध्या नगरी मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी तब्बल १०० एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत.मात्र,कार्यक्रमाआधीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध करण्यात आला आहे.कार्यक्रमासंबंधित अंनिसकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

अंनिसच्या संभाजीनगर शाखेच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “धिरेंद्र कृष्ण शास्त्री, (बागेश्वर धाम, मध्य प्रदेश) हे अध्यात्माच्या नावाने करीत असलेले चमत्कारांचे दावे, फलज्योतिषाचा प्रचार, प्रसार, स्वत:कडे कोणतीही वैद्यक शास्त्राची पदवी नसताना लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय सांगणे, छ्द्मविज्ञानाचा वापर हे सर्व भंपक प्रकार भारतीय संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्याशी पूर्णपणे विसंगत आहेत. शिवाय आतापर्यंत त्यांनी अध्यात्माच्या नावाने मोठमोठ्या जनसमुहासमोर जेही कार्यक्रम देशात ठिकठिकाणी केलेले आहेत ते प्रसारमाध्यमांत यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचही सखोल तपासणी करावी. तसेच त्यांच्यावर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी.”

हे ही वाचा:

‘तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम करावे’

इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर

ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

बागेश्वर बाबा यांच्या अशास्त्रीय दाव्यांमुळे जादूटोणा विरोधी कायदा तसेच फसवणुकीविरूधी कायदा, ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज (आक्षेपार्ह जाहिराती) अॅक्ट १९५४, मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्ट अशा कायद्यातिक कलमांचा भंग होतो. असे महाराष्ट्र अंनिसचे म्हणणे असून त्यानुसार त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच असा चमत्कारिक दाव्यांचा कार्यक्रम होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय दबावापोटी जर कार्यक्रम झालाच तर, त्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग करावे. ते तपासून त्यानंतर सदर कायद्यानुसार धिरेंद्र शास्त्री बाबावर कायदेशीर कारवाई करावी, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा