25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेष‘तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम करावे’

‘तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम करावे’

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा सल्ला

Google News Follow

Related

‘भारताची उत्पादकता ही जगात अतिशय कमी आहे. मागील दोन ते तीन दशकांत मोठी प्रगती केलेल्या अर्थव्यवस्थांशी भारताला स्पर्धा करावयाची असेल तर तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे,’ असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी दिला.

 

‘द रेकॉर्ड’ या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. यावेळी मूर्ती यांनी भारताची उत्पदकता वाढवण्याची तत्काळ गरज असल्याचे अधोरेखित केले. भारतातील तरुणांनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल न केल्यास गेल्या काही दशकांत चांगली प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांना गाठणे कठीण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी संवाद साधताना मूर्ती यांनी भारताची उत्पादकता जगामध्ये सर्वांत खालच्या स्तरावर असल्याकडे लक्ष वेधले. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनीसारख्या देशांनी आपल्या कामाचे तास वाढवून कामात झोकून दिले होते. त्यामुळे आपल्यालाही चीनसारख्या देशांना गाठण्यासाठी तशी मेहनत घ्यावी लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

‘आपण उत्पादकता वाढवत नाही. सरकारमधील भ्रष्टाचार कमी करत नाही, तोपर्यंत इतर देशांशी स्पर्धा करू शकत नाही. नोकरशाहीकडून निर्णय प्रक्रियेस लागणारा विलंब आपल्याला इतर देशांशी स्पर्धा करण्यात अडसर ठरत आहे. त्यामुळेच माझी तरुणांना विनंती आहे की, हा माझा देश आणि मी त्यासाठी आठवड्याला ७० तास काम करणार आहे, असा निर्धार त्यांनी करावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

हे ही वाचा:

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

‘तीनशे वर्षांत प्रथमच भारताला इतर देशांकडून सन्मान मिळत आहे. त्यामुळे आता प्रत्येक भारतीयाची हा सन्मान वाढविण्याची जबाबदारी आहे. आपण शिस्त पाळून आपली उत्पादकता वाढवायला हवी. आपण या गोष्टी जोवर करीत नाही, तोवर सरकार तरी एकटे काय करणार?’, असा प्रश्न मूर्ती यांनी उपस्थित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा