भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधी मंडळ विदेशात पाठवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, याला ऐतिहासिक आणि निर्णायक पाऊल म्हटले आहे. हे प्रतिनिधी मंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्य देशांसह भारताचे प्रमुख आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना भारताची दहशतवादविरोधी भूमिका, लष्करी कारवाया आणि ऑपरेशन सिंदूरविषयी माहिती देईल.
मनोज तिवारी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ एक देशभक्तिपर गीत देखील सादर केले आहे. गायक आणि गीतकार या भूमिकेत त्यांनी लिहिलेले गीत आहे – “प्रण है सिंदूर से, रण है सिंदूर तक”. हे गीत त्यांनी भारतीय मातां आणि मुलींना समर्पित केले आहे, ज्यांच्या पतींच्या आणि कुटुंबांच्या स्वप्नांना दहशतवाद्यांनी उध्वस्त केले. ते म्हणाले, “जेव्हा आमचे सैनिक शौर्य दाखवतात, तेव्हा प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य असते की तो देशभक्तिपर गीतांनी त्यांच्या मनोबलात भर घालावी.
हेही वाचा..
आता आमचे लक्ष अमरनाथ यात्रेकडे
डीपीआयआयटी आणि जीईएपीपी यांच्यात भागीदारी !
पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय बदल केले ?
यूपीच्या जंगलांमध्ये सुरू झाली विस्टाडोम ट्रेन सेवा
गीतातील आणखी एका ओळीचा उल्लेख करत ते म्हणाले, “तुमने किया है शुरू तो सुन लो, मोदी करेगा खत्म कहानी”. हे फक्त एक गाणं नाही, तर भारतीय जनतेचा आवाज आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तिवारी म्हणाले की, पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद समर्थक धोरणांचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश होणं गरजेचं आहे. मोदी सरकारने जे सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, ते अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यातून अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या देशांना भारताची भूमिका स्पष्ट केली जाईल.
पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर झालेल्या हल्ल्याबाबत, तिवारी म्हणाले की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतः स्वीकारले आहे की भारताने हा हल्ला केला. त्यांनी रात्री दोन वाजता जनरल मुनीरच्या फोननंतर ही कबुली दिली होती. आधी पाकिस्तानने ही बातमी फेक असल्याचे म्हटले होते, पण व्हिडिओ फुटेज आणि पुरावे समोर आल्यानंतर सत्य उघड झाले.
शाहबाज शरीफ यांना आता हे स्पष्ट करावं लागेल की, त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी तळांविरोधात ते काय कारवाई करत आहेत. उशिरा का होईना, पाकिस्तानला जगाला दाखवावं लागेल की तो आता दहशतवादाला पाठींबा देणं थांबवत आहे. तिवारी पुढे म्हणाले, “आता विरोधकांचीही परीक्षा आहे – ते खरंच दहशतवादाविरोधात आहेत की फक्त राजकीय फायद्यासाठी सरकारला विरोध करत आहेत. जेव्हा ऑपरेशन सुरू झाले, तेव्हा सर्व पक्षांनी समर्थन दिलं – अगदी ओवैसी आणि राहुल गांधींनीही. आता ते समर्थन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची वेळ आली आहे.
