27 C
Mumbai
Saturday, October 12, 2024
घरविशेषअनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !

अनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची माहिती

Google News Follow

Related

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांचे वसुलीचे आरोप हे खरे आहेत. तसेच विरोधकांना अडकवण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव टाकला जायचा. सध्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांसारख्या अन्य विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करून अडकवण्याचा प्रयन्त केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. गुन्हे दाखल करणारे सूत्रधार अनिल देशमुख असून त्याचे धागेदोरे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

अँटिलीया प्रकरणामध्ये तुमचे नाव होते, त्यासाठी तुम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत डील केली आणि त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा खोटा आरोप केला, असा आरोप तुमच्यावर आहे. यावर परमबीर म्हणाले की, अनिल देशमुख यांचे बिनबुडाचे आरोप आहेत. अनिल देशमूख यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे वाटते. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. त्यामध्ये माझ्याबद्दल अभद्र, असभ्य भाषेचा वापर करून मला कुत्रा, साला असे बोलत आहेत. महाराष्ट्राची ही संस्कृती-संस्कार नाहीये.

अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपावर ते म्हणाले की, आरोप सर्व खरे असून माझ्याकडे तशी माहिती होती. अधिकाऱ्यांकडून देखील तशी माहिती होती. तसेच अनिल देशमुख स्वतः बोलता-बोलता बोलून जायचे की, पार्टीसाठी कलेक्शनचे टार्गेट आहे. १०० करोड हुन अधिक रुपयांचे देशमुखांचे टार्गेट होते. ट्रान्सपोर्ट, पोस्टिंग्स, अवैद्य धंद्यांपासूनच त्यांना १०० करोड रुपयाचे टार्गेट पूर्ण करायचे होते. इतर गोष्टींचे वेगळे होते. सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये कुंदन शिंदे आणि अन्य एजेंट बरोबर बसत असत, त्या ठिकाणी ऑफिसर्स, धंदेवाले, अशा अनेक लोकांना बोलावून त्यांच्यासोबत डील केली जात असे, यांचे टार्गेट खूप मोठे होते. केवळ मुंबईमधून महिन्याचे १०० कोटी रुपयांचे त्यांचे टार्गेट असे, याची माझ्याकडे खात्रीशीर माहिती आहे.

जेव्हा माझ्या निदर्शनास आल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, अनिल परब यांच्या बंगल्यावर जाणून तसेच अन्य मंत्र्यांना देखील भेटून ही सर्व माहिती निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांना याची पहिलीच कल्पना असल्याचे त्यांच्याकडे पाहून समजले, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. माज्याकडे आजही अनिल देशमुख यांचे पर्सनल लिखित पत्रे आहेत, ज्यामध्ये त्यांनी स्वतः सही करून कोणत्या अधिकाऱ्याची पोस्टिंग, कोणाच्या म्हणण्यानुसार कुठे करायची याचा उल्लेख आहे.

तसेच माझ्याकडून जुलै २०२० मुंबईमध्ये मिरीटनुसार डीसीपींची पोस्टिंग केली होती. मात्र, अचानक अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग थांबवण्यात आल्या. याचे कारण मात्र संगितिले नाही. परंतु, चार-पाच दिवसानंतर त्या अधिकाऱ्यांच्या त्याच ठिकाणी पोस्टिंग करण्यात आल्या, केवळ दोन-तीन इमानदार अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग इतर ठिकाणी करण्यात आल्या.

ते पुढे म्हणाले की, माझ्यावर देखील पॉलिटिकल दबाव टाकण्यात आला. जयकुमार कुमार रावल आणि गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी माझ्यावर दबाव टाकला. मी नकार दिल्याने २०२० साली मला सिल्वर ओकवर बोलावण्यात आले, त्याठिकाणी अनिल गोटे, अनिल देशमुख, पीपी चव्हाण होते, शरद पवारांच्या हाताखालीच ही बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मी साफ नकार दिला. जयंत पाटील यांनी देखील स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलावून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच जयंत पाटील सांगली जिल्यातील एका मेडिकल कॉलेजवर कारवाई करण्याचे संगितिले. मात्र, मी नकार दिला.

मातोश्रीवर देखील मला बोलावण्यात आले होते. अनिल देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याठिकाणी मला भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आला. मुंबई को-ऑपरेटिव्ह संबंधित दरेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्याकाळात राजकारणातील विरोधकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाण्यामधील एका जुन्या केस प्रकरणी मला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मुख्य आरोपी करण्याचा देखील यांचा डाव होता. याबाबत माझ्याकडे व्हिडिओ क्लिपचा पुरावा आहे, वेळ आल्यानंतर तोही बाहेर काढेन.

हे ही वाचा :

“ऑलिम्पिक अपात्रता प्रकरणात विनेशसोबत कोणताही कट रचलेला नाही”

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार !

दिल्ली दरबारी जाऊन, भजन, पाद्यपूजन करून चरणामृत घेऊन आले, परंतु कटोरा रिकामाच !

होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला

चांदीवाल कमिशन बाबत देखील तुमच्यावर आरोप करण्यात आले होते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, माझ्यावर नाहीतर अनिल देशमुखांविरुद्ध आरोप होते. माझाकडे सर्व पुरावे आहेत वेळ आली की बाहेर काढेन. यांचे सर्व कारनामे समोर आणेन, कशाप्रकारे राजकीय विरोधक नेत्यांवर पोलीस बळाचा वापर करायचे. तसेच यामध्ये तत्कालीन डिजिपी संजय पांडे, डीसीपी लक्ष्मीकांत पाटील आणि शेखर जगताप यांचा कसा सहभाग होता, याची माहिती वेळ आली की सांगेन. यामध्ये मुख्य सूत्रधार अनिल देशमुख तर आहेच, मात्र त्याचे धागेदोरे मात्रोश्री, सिल्वर ओक आणि अन्य ठिकाणी पोचलेले असायचे. मुख्य विरोधक नेत्याला देवेंद्र फडणवीस, अन्य नेत्यांना यांच्याकडून टार्गेट केलं जायचं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्यांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, अनिल देशमुख यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असून त्यांनाही हिरो बनायचं होत हे पक्के नाही पण माहिती आहे. या प्रकरणी ते म्हणायचे की, मोठं-मोठ्या डायरेक्टरांना, अभिनेत्यांना चौकशीसाठी बोलावले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण चौकशी कशी असते याची माहिती होईल आणि या मार्फत अनेक लोक त्यांच्याकडे धावून येतील आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांची एक ओळख तयार होईल.

अँटिलीया केस प्रकरणी सचिन वाझे तुम्हाला रिपोर्ट करायचे, तुमच्या म्हणण्यानुसार हे सर्व चालू होत, असा आरोप तुमच्यावर करण्यात येतो. यावर ते म्हणाले की, या प्रकरणी चौकशी झालेली आहे. एटीएस, एनआयएने देखील याची चौकशी केली आहे. अचानक तीन वर्षानंतर यांना हे सर्व आठवत आणि हे आरोप करतात. या प्रकरणी मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, अनिल देशमुख आणि त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी देखील सोबत यावे. यांनी अनेक मोठे कांड, अन्याय केले आहेत. माझ्याकडील आताची माहिती ही १० ते २० टक्के आहे, अजून खुप काही यांचे बाकी आहे, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा