27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषचंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !

चंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !

विरोधकांना धक्का

Google News Follow

Related

जेएमएम पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल (३० ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. आता  चंपाई सोरेन यांच्या पाठोपाठ लोबिन हेमब्रम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी आणि माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या उपस्थितीत हेमब्रम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नुकतेच झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) आमदार लोबिन हेमब्रम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नेत्यांची भर पडत असल्याने विरोधकांना चांगला फटका बसणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा :

पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी

राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांचे सरकार बनले तर भारताचा पाकिस्तान-बांगलादेश होईल !

राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !

‘महिलांसंबंधित गुन्ह्यांवर जलद निकालांची गरज’

दरम्यान, माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत रांची येथे भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी ‘टायगर जिंदा है’ म्हणत त्यांचे पक्षात स्वागत केले होते. चंपाई सोरेन यांची झारखंडमध्ये ‘कोल्हन टायगर’ या नावानेही ओळख आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा