भोजपुरी लोकगायिका स्वाती मिश्रा आपल्या मधुर आवाज आणि भक्तिभावपूर्ण गीतांसाठी प्रसिद्ध आहेत. २०२४ मध्ये त्यांनी गायलेले ‘राम आएंगे तो अंगना सजाऊंगी’ हे भजन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते, कारण त्याच काळात अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वाती मिश्रा यांच्या गायनशैलीचे आणि गीताचे कौतुक केले असून, त्याने गायिका आनंदाने गदगद झाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरुवारी पीएम मोदी बिहारमधील जनसभेला उपस्थित झाले. तेथे त्यांनी स्वाती मिश्रा यांचे सुप्रसिद्ध भजन ‘राम आएंगे तो अंगना सजाऊंगी’ मंचावरूनच गुणगुणले. जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “देशात राम मंदिर बांधले गेले — तेही ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर. तुम्ही अभिमानाने सांगू शकता की छपरा येथील कन्या स्वाती मिश्रा यांच्या रामगीताने संपूर्ण जग दुमदुमले. त्या गीताचे बोल किती सुंदर आहेत!”
हेही वाचा..
देशभरातील ७६ रेल्वे स्थानकांवर होल्डिंग एरिया उभारण्याच्या योजनेला मंजुरी
मुंबईत २० मुलांना ओलीस ठेवलं; मुलांची सुखरूप सुटका करत आरोपीला ठोकल्या बेड्या
जो विदेश पळून जातो, त्याला छठ पूजेचं ज्ञान काय?
भगवान श्रीरामांविषयी वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या अनस पठानच्या आवळल्या मुसक्या
पंतप्रधान मोदी स्वतः तिचे भजन गात असल्याचे पाहून स्वाती मिश्रा आनंदाने भारावून गेली. आपल्या भावना व्यक्त करत तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “माझ्या भजनाचे कौतुक केल्याबद्दल आणि माझे नाव इतक्या सन्मानाने घेतल्याबद्दल मी किती आभार मानू ते कमीच आहे. मी या प्रेम आणि आदराची पात्र आहे की नाही माहीत नाही, पण आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कायम ठेवेन आणि पुढे आणखी सुंदर भजनं सादर करेन.”
या पोस्टमधून स्पष्ट होते की स्वातीला आता आणखी प्रेरणा मिळाली आहे. अलीकडेच तिने छठ पर्वाच्या निमित्ताने ‘छठ के त्योहार’ हे गीत प्रसिद्ध केले होते, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती नियमितपणे नवीन भक्तिगीतं सादर करत असते. हेही उल्लेखनीय आहे की स्वाती मिश्रा यांचे वडील राजेश मिश्रा यावर्षी मे महिन्यात भाजपात सामील झाले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रदीप जायसवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.







