27.3 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरविशेषफेक नरेटिव्हचा रावण, मारू नाभीत बाण, चढू सत्तेचा सोपान!

फेक नरेटिव्हचा रावण, मारू नाभीत बाण, चढू सत्तेचा सोपान!

देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश

Google News Follow

Related

विधासभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येईल. फेक नरेटिव्हच्या विरुद्ध लढण्यास आम्ही कुठे तरी कमी पडलो. मात्र, आता फेक नरेटिव्हला उत्तर देण्याची ताकद आमच्याकडे आहे. आजचा रावण फेक नरेटिव्ह आहे त्याच्या बेंबीत बाण मारल्यानंतर पुन्हा सत्तेमध्ये येऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजपचे पुण्यामध्ये पार पडलेल्या महाअधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या विजयाचा फुगा टाचणी मारून फोडला
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवल्याने आजही गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. भाजप निवडणूक आले तर आरक्षण, संविधान बदलतील असा फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला. मात्र, जे कोठ असतं त्याच वय मोठं नसत आणि जे खरं असत त्याच वय मोठं असत. विरोधकांचा विजया हा फुग्या सारखा आहे, परंतु विधानपरिषदेत यांचा फुगा आम्ही टाचणी मारून फोडला.

एकीकडे योजनेला विरोध आणि दुसरीकडे सर्वात पहिले यांचे पोस्टर
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, विरोधकांनी याला विरोध केला. सभागृहात हे म्हणतात, ही योजना बंद करू, योजना चालू शकणार नाही, ही खोटी योजना आहे. परंतु, गावामध्ये सर्वात पहिले पोस्टर हेच लावतात. हे सर्व लबाड आहेत. राज्यातल्या महिलांनी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. कारण विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारला ते द्यायचे नाही. ही योजना फसेल यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा..

अफगाणींचा पाकिस्तानी दूतावासावर हल्ला, पाकचा ध्वज उतरवला !

फ्लाईटमध्ये विनयभंग; जिंदाल स्टीलच्या सीईओला गमवावी लागली नोकरी !

एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

बांगलादेश हिंसाचार; ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’

मैदानात उतारा बॅटिंग करा
ते पुढे म्हणाले, सिलेंडरच्या किमती वाढल्या असे म्हणतात. २०१३ सालच्या किमती जेव्हा विरोधकांना दाखल्यावर यांची बोलती बंद झाली. ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला आमच्या प्रत्येकाकडे उत्तर आहे, उत्तर द्यायची तयारी देखील सर्वांची असते. मात्र, आदेशाची वाट पहावी लागते. परंतु, मी सर्वांना आज परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे त्याने मैदानात उतरून करा. मात्र, माझी एक अट आहे ती म्हणजे फक्त आपली हिट विकेट होता जमा नये. आता आदेश विचारू नका, मैदानात उतारा आणि ठोकून काढा, असे फडणवीस म्हणाले.

मतांकरिता समाजात विरोधकांकडून दुफळी निर्माण
आज सध्या समाजात दुफळी तयार झाली आहे. काही जण त्यामध्ये तेल टाकण्याचे काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भाजपची पाहिल्यापासूनची भूमिका आहे. १९८२ साली स्वर्गीय अण्णा साहेब पाटलांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भेटून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली. जर नकार दिलात तर जीव देईन असे ते म्हणाले. त्यावर काँग्रेस मंत्र्याने आरक्षण नाही देत म्हणाले. यानंतर अण्णा साहेब पाटलांनी स्वतःवर गोळी घालून जीव दिला. १९८२ ते आताच्या काळापर्यंत शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते मग त्यांनी का आरक्षण दिले नाही, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तेव्हा स्वतः मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे सांगितले आणि आता मतांकरिता दुफळी निर्माण करण्याचे काम सुरु आहे.

विरोधकांचा बुरखा फाडणार, हिंदू असल्याचा गर्व
माझा सवाल मनोज जरांगे यांना नसून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना यांना आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास तुमचे समर्थन आहे का?, हे स्पष्ट करावे. आता आम्हाला शिव्या खायची सवय आहे, समाजासाठी शिव्या खाण्यास तयार. मात्र तुमचा बुरखा फाडल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्या हिंदुत्व बद्दल कोणालाही अपादबोध ठेवण्याची आवश्यकता नाही. आम्ही हिंदू आहोत हे गर्वाने सांगतो. देशातल्या हिंदूंनी कधीच भेदभाव केला नाही. मात्र आमचं जर कोणी अस्तित्व संपण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा